न्यूबन गावात राहू न देण्यावरून महिलेचा विनयभंग व मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:37+5:302021-03-07T04:28:37+5:30

पोलीस सूत्रानुसार, तळोदा तालुक्यातील न्यूबन येथील राजकुमार ठाकरे, राजेश राजकुमार ठाकरे, अजय राजकुमार ठाकरे, विनोद दिलीप ठाकरे, युवराज ...

Woman molested and beaten for not staying in Newban village | न्यूबन गावात राहू न देण्यावरून महिलेचा विनयभंग व मारहाण

न्यूबन गावात राहू न देण्यावरून महिलेचा विनयभंग व मारहाण

पोलीस सूत्रानुसार, तळोदा तालुक्यातील न्यूबन येथील राजकुमार ठाकरे, राजेश राजकुमार ठाकरे, अजय राजकुमार ठाकरे, विनोद दिलीप ठाकरे, युवराज दिलीप ठाकरे, शैलाबाई दिलीप ठाकरे, यशवंत जमवंत ठाकरे, मुन्ना काळूसिंग ठाकरे, रामदास बारकू, कुवरसिंग (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी न्यूबन शिवारातील शेतात २८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ४५ वर्षीय महिलेचा हात धरला. राजेश ठाकरे याने पोटावर मारले तर अजय ठाकरे याने अंगावरचे ब्लाऊज फाडून लज्जा वाटेल असे कृत्य केले. विनोद याने त्याच्या हातातील काठीने मारले. युवराज ठाकरे याने अंगावर असलेली साडी काढून फेकून देत लाज वाटेल असे कृत्य केले. काहींनी डोक्याचे केस धरले. आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे करीत आहेत.

Web Title: Woman molested and beaten for not staying in Newban village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.