दुचाकीच्या चाकात पदर अडकून पडल्याने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:48 IST2019-07-17T12:47:55+5:302019-07-17T12:48:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकीवर बसलेल्या महिलेचा साडीचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना ...

दुचाकीच्या चाकात पदर अडकून पडल्याने महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुचाकीवर बसलेल्या महिलेचा साडीचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार-उमर्दे रस्त्यावर 14 रोजी दुपारी घडली. दरम्यान, ज्याने महिलेला लिफ्ट दिली होती तो दुचाकीस्वार घटनेनंतर पसार झाला. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
कल्पनाबाई दिलीप मराठे (48) रा.उमर्दे, ता.नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे. उमर्देकडून नंदुरबारकडे जाण्यासाठी कल्पनाबाई यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली होती. दुचाकीस्वाराने त्यांना बसवून नंदुरबारकडे येत असतांना महिलेचा पदर अचानक दुचाकीच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पनाबाई या रस्त्यावर पडून जबर जखमी झाल्या.
अपघात घडल्यानंतर भितीपोटी दुचाकी चालक तेथून पसार झाला. रस्त्याने येणा:या-जाणा:या व आजूबाजूच्या शेतात काम करणा:यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेचा मृत्यू झाला.
याबाबत नामदेव विश्राम मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहे.