बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दोन लाखाचे दानिगे लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:44 IST2020-03-06T11:44:10+5:302020-03-06T11:44:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील बसस्थानकातून गुजरात राज्यातील बसमध्ये चढलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख रुपये किमतीचे लंपास झाल्याची ...

 The woman on board the bus pulled out two lakh rupees | बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दोन लाखाचे दानिगे लांबवले

बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दोन लाखाचे दानिगे लांबवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील बसस्थानकातून गुजरात राज्यातील बसमध्ये चढलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख रुपये किमतीचे लंपास झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १़३० वाजता घडली़ घटनेमुळे खळबळ उडाली आहे़
ज्योती मदन शिंपी रा़बडोदा ह्या दुपारी दीड वाजता गुजरात राज्यातील बसमध्ये चढत असताना त्यांची पर्स अज्ञात व्यक्तीने लंपास केली़ या पर्समध्ये मंगळसूत्र, गळ्यातील हार पाटल्या व चेन असे सोन्याचे दोन लाख १६ हजार रुपयांचे दागिने होते़ ज्योती शिंपी यांना पर्स न मिळून आल्याने आरडाओरड केली़ परंतू तोवर चोरटा पसार झाला होता़ याबाबत ज्योती शिंपी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  The woman on board the bus pulled out two lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.