एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालेना, एकही कागद सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:44+5:302021-08-18T04:36:44+5:30

नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सामान्यांना त्रासदायक ठरत आहे. याठिकाणी कोणतेही काम वाढीव पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव ...

Without the agent, no stick was moved in the RTO office, no paper was moved | एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालेना, एकही कागद सरकेना

एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालेना, एकही कागद सरकेना

नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सामान्यांना त्रासदायक ठरत आहे. याठिकाणी कोणतेही काम वाढीव पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव असून ‘लोकमत’ने पडताळणी केली असता, एजंटांविना कार्यालयात काडीही हालत नसल्याचे दिसून आले. लर्निंग वगळता इतर सर्व कामांसाठी अधिकारीच नागरिकांना एजंटकडे पाठवत असल्याचे या पडताळणीदरम्यान समोर आले. यातून नागरिकांनाच त्रास झाल्याचे दिसून आले.

वाहन फिटनेस सर्टिफिकेट

वाहन फिटनेससाठी चारचाकी, ट्रक तसेच पिकअप या वाहनांसाठी ६०० ते १२०० रुपये शासकीय फी आहे; परंतु येथे पाच हजारांपर्यंत वसुली केली जाते.

पर्मनंट लायसन्स

पर्मनंट लायसनची शासकीय फी ही ७०० ते १ हजार एवढी आहे; परंतु प्रत्यक्षात नागरिकांना साडेतीन हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे दिसून आले.

गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे

दुचाकी ते मोठी वाहने नावावर करण्यासाठी ४०० ते २ हजार एवढा शासकीय खर्च आहे. प्रत्यक्षात मात्र दुप्पट पैसे नागरिकांना द्यावे लागतात.

आरटीओ कार्यालयाचा भूलभूलय्या

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवानाधारक ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून काही जण कामकाज करतात. त्यांना अधिकारीच नागरिकांकडून अधिकचे पैसे घेण्याची सक्ती करत असल्याचे यावेळी दिसून आले. एका कामामागे दीड हजारपर्यंत रक्कम वसुली केली जाते.

अधिकारी म्हणतात, ते तर वाहन मित्र !

याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आरटीओ कार्यालयाच्या आवारात कार्यरत एजंट नसून वाहन मित्र आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्याने त्यांना काम दिल्यास ते आरटीओमार्फत करू शकतील, त्याला कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले.

दरम्यान कार्यालयात पाय ठेवल्यानंतर एजंटांचाच गराडा पडल्याचे दिसून आले. या एजंटांकडे कामाला असलेले छोटे एजंड सतत धावपळ करताना दिसले.

बहुतांश एजंटांना आरटीओचे अधिकारीच बोलावणे पाठवून कामे साेपवत असल्याचे या पडताळणीत दिसून आले.

एजंटकडून गेले की झटपट आणि विनातक्रार

अधिकाऱ्यांनी एजंटांकडे एखाद्या अडल्या-नडल्या व्यक्तीला पाठवल्यानंतर काही मिनिटात पैसे देऊन ते काम पूर्ण होत असल्याचे यावेळी दिसून आले. बहुतांश नागरिक काम लवकर व्हावे यासाठी वाढीव पैसे देऊन मार्गी लागत असल्याचे चित्र होते. आरटीओ टेस्ट तसेच इतर अनेक कामांसाठी ऑनलाइन सिस्टम असतानाही आरटीओ कार्यालयातूनच एजंटांनाच संपर्क साधण्याचे सांगण्यात येत होते.

लर्निंग लायसन्ससाठी सारथी ॲपवर अर्ज केला होता. तारीख मिळाली; पण ऐन चाचणीच्या वेळी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. एजंटकडे गेल्यानंतर काम तातडीने पूर्ण झाले.

- १९ वर्षीय युवक, नंदुरबार

चारचाकी वाहन नावावर करून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारत आहे; परंतु वाहन दुसऱ्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीतील आहे. तेथून हे आणा, ते आणा, असे केले जात आहे. अधिकारी एजंटला भेटा म्हणून सांगतात.

-वाहनमालक, नंदुरबार.

Web Title: Without the agent, no stick was moved in the RTO office, no paper was moved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.