Vidhan Sabha 2019: नवापूर विधानसभा मतदारसंघात परवानग्यांसाठी एक खिडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:51 IST2019-09-27T12:50:58+5:302019-09-27T12:51:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर विधानसभा मतदारसंघातर्गत नवापूर तहसिल कार्यालयात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना वेगवेगळ्या परवानग्या आणि परवाने ...

A window for permits in the Navapur assembly constituency | Vidhan Sabha 2019: नवापूर विधानसभा मतदारसंघात परवानग्यांसाठी एक खिडकी

Vidhan Sabha 2019: नवापूर विधानसभा मतदारसंघात परवानग्यांसाठी एक खिडकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर विधानसभा मतदारसंघातर्गत नवापूर तहसिल कार्यालयात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना वेगवेगळ्या परवानग्या आणि परवाने घेण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याच माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहीरसभांची परवानगी संबंधीत कार्यक्षेत्राच्या पोलीस अधिका:यांमार्फत देण्यात येणार असून परवानगीसाठी अर्जासोबत जागा मालकाचे संमतीपत्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. पोस्टर्स किंवा ङोंडे सभेच्या ठिकाणी लावणे आणि खाजगी जागेवर जाहीरात फलक लावण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी किंवा ग्रामसेवकाकडून परवानगी देण्यात येईल. त्यासाठी अर्जासोबत जागा मालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे.
प्रचार वाहनाची व प्रचार कार्यालयाची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी देतील. वाहनासाठी अजार्सोबत वाहनमालकाचे संमतीपत्र, वाहनाचे नोंदणीपत्र, वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनचे वैध वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि वाहन चालकांचा वैध परवाना आवश्यक आहे. कार्यालयासाठी जागा मालकाचे संमतीपत्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला आवश्यक आहे.
ध्वनीक्षेपक व मिरवणूक किंवा रॅलीजची परवानगी संबंधीत क्षेत्राचे पोलीस अधिकारी देतील. केबल जाहीरातीची परवानगी जिल्हा निवडणूक अधिकारी देतील. परवानग्या देण्यासाठी नगर परिषद, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचायत समिती, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांचा एक जबाबदार अधिकारी कक्षात उपस्थित राहील. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नवापूर यांच्या कार्यालयातच परवानग्या देण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी कळविले आहे.
 

Web Title: A window for permits in the Navapur assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.