दोन दिवसात अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:25 IST2019-07-24T11:25:39+5:302019-07-24T11:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध ...

Will report in two days | दोन दिवसात अहवाल देणार

दोन दिवसात अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध सण, उत्सवांची रेलचेल राहणार असल्यामुळे अशा काळात निवडणुका आणि सण-उत्सव यांचा बंदोबस्त अशी दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यादृष्टीने अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुद्दा सद्या ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीनंतर दिलेल्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोग आणि नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिका:यांशी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुण तयारीसंदर्भात आढावा घेतला. त्यात निवडणुका आणि सण-उत्सवांच्या काळातील बंदोबस्त याची सांगड कशी घातली जाणार याबाबत मुद्दा अडला आहे. त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. 
हिंदू धर्मात श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. थेट दिवाळीर्पयत ती कायम राहते. स्थानिक स्तरावरील दशा माता उत्सव, श्रीकृष्ण अष्टमी, दहीहंडी उत्सव, पोळा, गणेशोत्सव असे विविध सण या काळात येतील. यावेळी दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधीच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका  जाहीर झाल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून जिल्हा प्रशासनाला दुहेरी कसरत होणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची एकुणच तयारी आहे किंवा कशी याची चाचपणी करून तातडीने अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर आयोग निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. 
मतदार यादी तयार
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच मतदार यादी तयार केली आहे. त्यामुळे मतदार यादी जाहीर करणे,हरकती मागविणे व मतदार यादी अंतिम करणे या बाबींमधील वेळ वाचणार आहे. त्यामुळे ही एक बाब तयारीच्या दृष्टीने सुलभ राहणार आहे.
गट, गण रचनाही तयार
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची रचना यापूर्वीच   अंतिम करण्यात आलेली आहे. गट, गण रचनांवरील हरकती आणि त्या अंतिम करण्याची सर्व प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने पुर्ण करून ठेवली आहे. 
आरक्षणही जाहीर
गट, गणांचे आरक्षणही यापूर्वीच जाहीर करून ते राजपत्रात प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे या पातळीवरील तयारीही पुर्ण आहे. त्याचा अहवालही यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे.
मतदान केंद्रांची स्थिती
मतदान केंद्रांच्या स्थितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने माहिती मागविली आहे. परंतु सद्य स्थितीत ग्रामिण भागातील मतदान केंद्रांचीही तयारी अद्ययावत राहील अशी स्थिती आहे. कारण दोनच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान केंद्र अद्ययावत करण्यात आलेली होती. त्यामुळे या मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाकडे तयार आहेच. 
एकुणच जिल्हा परिषद निवडणुकीची अधिसुचना कधीही जाहीर होईल अशी स्थिती प्रशासन स्तरावर आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अधिका:यांनी मंगळवारी जिल्हाधिका:यांशी व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुणच जिल्हा परिषद निवडणुकविषयीची तयारी यासंदर्भात जाणून घेतले. जिल्हाधिका:यांनी मतदार यादी, गट, गण रचना, आरक्षण आदी तयारी यापूर्वीच पूर्ण असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचा:यांची पुरेशी     संख्या देखील उपलब्ध असल्याचे सांगितले. फक्त मतदान केंद्र आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील    अहवाल दोन दिवसात सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसात निवडणुकीची अधिसुचना जाहीर होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Will report in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.