शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:11+5:302021-05-24T04:29:11+5:30

नंदुरबार : प्राथमिक शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तातडीने जाहीर कराव्या व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे याबाबत ...

Will announce teacher service seniority lists | शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या जाहीर करणार

शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या जाहीर करणार

नंदुरबार : प्राथमिक शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तातडीने जाहीर कराव्या व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी अखिल प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. शिक्षकांचे वेतन सध्या उशिराने होत आहेत. यावर सद्या कोरोना आजाराच्या अडचणींमुळे निधी उशिराने प्राप्त होतो म्हणून समस्या येतात. एप्रिल महिन्याचे बिले तयार असून निधी मिळाल्यावर लागलीच पगाराची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.

निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र होणाऱ्या व प्रशिक्षण न झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षणासाठी याद्या पुण्याला पाठवण्यात आलेल्या असल्याचे सांगण्यात आले.

निवडश्रेणीसाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ तत्काळ मिळवून देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे.

याशिवाय कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना ५० लाख रुपये मिळावे, पदोन्नती, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या यासह इतर विषयांवर चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक संघातर्फे लसीकरणासाठी व्यापक सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कॅफो प्रवीण देवरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण उपस्थित होते. शिष्टमंडळात शिक्षक संघाचे राज्य सल्लागार सुरेश भावसार, जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, सरचिटणीस अशोक देसले, संजय खैरनार, उमेश कोळपकर उपस्थित होते.

Web Title: Will announce teacher service seniority lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.