वन्यप्राण्यांचा हल्ला अंगावर घेणारे वनकर्मचारीच मदतीपासून ‘वंचित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:17 IST2019-11-25T11:17:01+5:302019-11-25T11:17:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिसाळलेल्या माकडाला वनक्षेत्रात सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वनरक्षकावर माकडाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती़ ...

Wildlife workers 'deprived' of help | वन्यप्राण्यांचा हल्ला अंगावर घेणारे वनकर्मचारीच मदतीपासून ‘वंचित’

वन्यप्राण्यांचा हल्ला अंगावर घेणारे वनकर्मचारीच मदतीपासून ‘वंचित’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पिसाळलेल्या माकडाला वनक्षेत्रात सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वनरक्षकावर माकडाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षातील ही चौथी घटना असून या कर्मचा:यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारे भरपाई देण्यात आलेली नाही़ 
सामान्य माणसावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्यास त्यात मृत्यूमुखी पडल्यास वनविभागाकडून तातडीने किमान 10 लाखांर्पयत मदत देण्याची तरतूद करण्यात आली आह़े जिल्ह्यात ही मदत तातडीने पोहोचवण्याचे काम गेल्या काही वर्षात होत असले तरी वन खात्याच्या कर्मचा:यांवर हल्ला झाल्यास कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नसल्याची माहिती समोर आली आह़े गेल्या दोन वर्षात नंदुरबार आणि नवापुर वनक्षेत्रात बिबटय़ा, वाघासह इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात चार वनकर्मचारी जखमी झाल्याचे प्रकार समोर आले होत़े यातून या कर्मचा:यांना हाताची बोटे, पाय, डोक्यावर जखमा होऊन मोठय़ा कालावधीसाठी सुटी घेऊन उपचार घ्यावे लागले आहेत़ या उपचारांचा खर्च वेतनातून करावा लागल्यानंतर शासनाकडून त्याचे योग्य त्या प्रमाणात ‘मेडीकल बिल’ काढण्याकरीताही चकरा मारव्या लागल्याची माहिती आह़े परंतू जखमा झाल्यानंतर शासनाकडून थोडीही मदत ेदेण्याची तसदी आजवर घेण्यात आलेली नाही़ सामान्य माणसाच्या जखमानुसार मदत करणारा वनविभाग आपल्याच कर्मचा:यांच्या बाबत गंभीर नसल्याचे चित्र आह़े 
दरम्यान शुक्रवारी माकडाच्या हल्ल्यात जखमी झत्तलेले वनरक्षक निकम यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यांच्या हातांच्या पंजाचे बोट आणि पाय यावर माकडाने अत्यंत हिंस्त्रपणे चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या होत्या़ या माकडाला नंदुरबार तालुक्याच्या वनात सोडण्यात आले असून डुबकेश्वर मंदिर परिसरात हे माकड नेमके कसे, आल़े तसेच याठिकाणी ते पिंज:यात ठेवल्याची माहिती मिळाल्याने वनविभाग तपास करत आह़े 
 

Web Title: Wildlife workers 'deprived' of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.