पत्नीचा खून करणा:या पतीला जन्मठेपेची शिक्षा

By Admin | Updated: June 18, 2017 17:02 IST2017-06-18T17:02:07+5:302017-06-18T17:02:07+5:30

शहादा न्यायालयाने दिला निकाल

Wife's murderer: The husband's life imprisonment | पत्नीचा खून करणा:या पतीला जन्मठेपेची शिक्षा

पत्नीचा खून करणा:या पतीला जन्मठेपेची शिक्षा

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.18- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणा:या पतीला शहादा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आह़े तळोदा तालुक्यातील रोझवा येथे 2014 मध्ये खूनाची घटना घडली होती़ 
तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट येथील रूमाल्या बाज्या वसावे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यास कुसळ घालून तिला ठार केले होत़े या घटनेचा साक्षीदार वसावे दाम्पत्याचा 12 वर्षीय मुलगा होता़ तळोदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पी़ ज़ेराठोड यांनी याप्रकरणी साक्षी पुरावे गोळा करून शहादा न्यायालयात सादर केले होत़े या खटल्याचे कामकाज होऊन 14 जून रोजी रूमाल्या वसावे यास जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आह़े शहादा न्यायालयाचे न्या. पी़बी़नाईकवाड यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ यात 9 साक्षीदार तपासण्यात आल़े 12 वर्षीय मुलाची साक्ष निर्णायक ठरली़ शासनातर्फे अॅड़ एस़ए़पाटोळे यांनी काम पाहिल़े 

Web Title: Wife's murderer: The husband's life imprisonment