शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आदिवासी विकास मंत्र्यांची पत्नी पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते़ बुधवारी तालुकास्तरावर मतमोजणी करण्यात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे़ निकाल ऐकण्यासाठी त्या-त्या तालुक्यातील उमेदवार, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची गर्दी उसळली होती़ अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात येत होत्या़ उत्सुकता शिगेला पोहोचल्याने प्रत्येक गट आणि गणाचा निकाला ऐकण्यासाठी केंद्रांबाहेर गर्दी वाढत होती़धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलताबाई पाडवी ह्या पराभूत झाल्या आहेत़ त्यांचा शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी पराभव केला़ दरम्यान धडगाव तालुक्यात काँग्रेसचे चार शिवसेनेचे तीन उमेदार विजयी झाले़नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूकीत प्रथमच भाजपाने मुसंडी मारली असून काँग्रेसच्या आजवरच्या वर्चस्वाला खिंडार पडले आहे़ शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा चौरंगी मुकाबला असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागून होते़ दरम्यान जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्ली ता़ नंदुरबार गटातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पुत्र अ‍ॅड़ राम रघुवंशी हे शिवसेनेकडून विजयी झाले आहेत़नवापुर तालुक्यातही काँग्रेसच्या वर्चस्वला राष्ट्रवाादी काँग्रेसने छेद दिला आहे़ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित सुरुपसिंग नाईक हे उमराण, दिपक सुरुपसिंग नाईक हे भरडू गटातून विजयी झाले़ तालुक्यातील खांडबारा गटातून लढणारे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा पराभव झाला़ त्यांना राष्ट्रवादीचे धरमसिंग ईज्या वसावे यांनी पराभूत केले़ तालुक्यातील चितवी गटातून काँग्रसेचे मातब्बर नेते बकाराम गावीत यांचाही पराभव झाला़ त्यांना राष्ट्रवादीचे सुरेश सुरुपसिंग गावीत यांनी पराभूत केले़ हाती निकालानुसार मोग्राणी गटातून राष्ट्रवादीच्या सुशिला कोकणी तर निजामपूर गटातून काँग्रेसचे प्रकाश फकिरा कोकणी हे विजयी झाले़ तालुक्यातील चिंचपाडा, रायंगण, बिलमांजरे आणि करंजी बुद्रुक या गटांचे निकाल बाकी होते़म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजीत पाटील यंनी विजय प्राप्त केला आहे़ दुसरीकडे काँग्रसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे नवापुर तालुक्यातून पराभूत झाले आहेत़नंदुरबारतालुक्यातील १० गट आणि २० गणांसाठी निवडणूक झाली होती़ तालुक्यातील कोळदे गटातून भाजपाच्या योगिनी अमोल भारती यांनी प्रथमच खाते उघडल्याने भाजपची विजयी सुरुवात झाली़ तर याच गणातून करण रमण भिल हे विजयी झाले़शहादाशहादा तालुक्यात सर्वाधिक १४ गट आणि २८ गणांसाठी निवडणूक घेण्यात आली यात कन्साई गटातून काँग्रेसच्या रजनी सुरेश नाईक ह्या विजयी झाल्या़ त्यांना ४ हजार ८३९ मते मिळली़ त्यांनी शकुंतला शामसिंग ठाकरे ( अपक्ष ), विजयाबाई तुळशीराम नाईक ( भाजप), प्रमिला सुदाम पराडके ( शिवसेना ), अंजली कैलास पावरा ( विश्व इंडियन पार्टी , संगिताबाई दिनगर शेमळे ( राष्ट्रवादी ) यांचा पराभव केला़कन्साई गणातून काँगेसच्या रंगलीबाई आपसिंग पावरा ह्या १ हजार ८४५ मतांनी विजयी झाल्या़ त्यांनी काँग्रेसच्या सुशिलाबाई प्रभाकर ठाकरे ( अपक्ष ), वसुबाई विक्रम पवार ( अपक्ष), कविता गमा पाडवी ( अपक्ष ), सविता सांबरसिंग पावरा ( भाजप ) यांचा पराभव केला़राणीपूर गणातून काँग्रेसचे विजयसिंग वन्या पावरा हे २ हजार ५८ मतांनी विजयी झाले़ त्यांनी भरतसिंग भता पावरा ( अपक्ष ), सचिन मानकºया पावरा ( अपक्ष ), वेशा तेरसिंग भिल ( भाजप ), कुवरसिंग फुलसिंग रावताळे ( शिवसेना ) यांचा पराभव केला़शहादा तालुक्यातील सर्वाधिक चर्चित असलेल्या म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजीत मोतीलाल पाटील हे ४ हजार ९३७ मतांनी विजयी झाले़ त्यांनी अब्दुल जब्बार शेख आजाद ( अपक्ष ), मनलेश एकनाथ जायसवाल ( मनसे ), भगवान खुशाल पाटील ( भाजप , विक्रांत अशोक पाटील ( राष्ट्रवादी ) आणि अपक्ष उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला़