पतीला बांधून ठेवत पत्नी व सासरच्यांनी एटीएमसह घराची कागदपत्रे केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:25 IST2019-04-02T12:25:16+5:302019-04-02T12:25:21+5:30
नंदुरबारातील घटना :पतीची पोलीसात फिर्याद

पतीला बांधून ठेवत पत्नी व सासरच्यांनी एटीएमसह घराची कागदपत्रे केली लंपास
नंदुरबार : कौटूंबिक वादातून ओढणी आणि रुमालाने बांधून ठेवत पत्नी व सासरच्यांनी एटीएम कार्ड आणि घराची कागदपत्रे चोरुन नेल्याची फिर्याद पतीने पोलीसात दिली आहे़ शहरातील कोरीट रोडवरील जमनादास पार्कमध्ये ही १० नोव्हेंबर २०१८ रोजी ही घटना घडली होती़
श्रीकृष्ण दुर्बलराम कुमार यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटूंबिक वाद झाले होते़ यातून त्यांच्या पत्नी सरीता भारती, सासरे रामनिवास, सासू उषादेवी, शालक शेखर व शालकाचा नातेवाईक शैलेंद्र चौधरी सर्व रा़ राजस्थान यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीकृष्ण कुमार यांना बेदम मारहाण केली होती़ यावेळी पत्नी सरिता भारती यांनी जिन्याला बांधून ठेवत त्यांच्या खिशातील एटीएम व घरातील धनादेश, इतर दस्तावेज आणि मूळ कागदपत्रे सोबत नेली होती़ याप्रकरणी पिडित पती श्रीकृष्ण कुमार यांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता़ यादरम्यान मारहाण झाल्याची व्हिडिओ क्लिप त्यांना मिळून आल्यानंतर त्यांनी ती पोलिसात दिल्यानंतर संशयितांविरोधात श्रीकृष्ण दुर्बलराम कुमार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोेलीस उपनिरीक्षक पी़पी़सोनवणे करत आहेत़
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी पिडित श्रीकृष्ण कुमार याची भेट घेत माहिती घेतली होती़
गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी हे राजस्थान येथे निघून गेल्याची माहिती देण्यात आली आह़े