नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदानातील घट कोणाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:42 IST2019-05-02T12:42:31+5:302019-05-02T12:42:45+5:30

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात अडीच टक्यांनी मतदान कमी ...

On whose path the voting of Nandurbar assembly constituency falls | नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदानातील घट कोणाच्या पथ्यावर

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदानातील घट कोणाच्या पथ्यावर

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात अडीच टक्यांनी मतदान कमी झाले आहे. यामुळे भाजपने गेल्या निवडणुकीत घेतलेले तब्बल 50 हजाराचे मताधिक्य टिकवून ठेवते  किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, यंदा मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा 35 हजार 561 इतकी वाढूनही मतदान कमी झाल्याने भाजप व काँग्रेस देखील चिंतन करू लागले आहेत.   
नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता नंदुरबार तालुक्यासह शहादा तालुक्यातील तापी पट्टयातील गावांचा समावेश यात आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील स्थानिक राजकारणाचा बराच प्रभाव मतदार संघावर पडत असतो. यंदा देखील तो दिसून आला. परिणामी भाजप व काँग्रेसनेही या मतदारसंघात मोठी मेहनत घेतली. भाजपच्या डॉ.हिना गावीत यांनी गेल्या निवडणुकीत मिळविलेले 50 हजार 55 चे मताधिक्य कायम ठेवण्यासाठी पक्षाने मेहनत घेतली तर हे मताधिक्यच मिळू नये यासाठी काँग्रेसने गाव आणि मतदार पातळीवर प्रचार करून प्रय} केला आहे. त्यातच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अडीच टक्यांनी मतदान कमी झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे. 
आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी चार महिन्यांनी पाच महिन्यांनी येणा:या विधानसभा निवडणुकीचीही मशागत या निमित्ताने करून घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जे काही नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते होते त्यांना जवळ करून घेतले. परंतु मतदारसंघातील पक्षाअंतर्गत नंदुरबार व शहादा तालुका हा छुपा गट निर्माण झाल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे येत्या काळात याबाबत आमदार डॉ.गावीत यांना काम करावे लागणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसने मतदारसंघातील आपल्या कार्यकत्र्याचे जाळे अधीक घट्ट करण्याचा प्रय} या माध्यमातून करून घेतला, गेल्या निवडणुकीतील भाजपचे तब्बल 50 हजारांचे मताधिक्य कमी व्हावे यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. नंदुरबार शहरात देखील लोकसभा निवडणुकीत भाजपला नेहमीच मिळणारा लीड यंदा काँग्रेसला मिळावा यासाठी पुरेपूर प्रय} केले. शेवटच्या टप्प्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरात घेतलेल्या दोन सभा आणि कार्यकत्र्याना कामाला लावल्यामुळे काँग्रेसला शहरात लीड मिळण्याची आशा आहे. 
भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनी देखील काही प्रमाणात मते घेतल्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजप की काँग्रेसला बसतो याकडेही लक्ष लागून आहे. 
युती । प्लस पॉईंट काय आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली जाहीर सभा ब:याच प्रमाणात वातावरण निर्मिती करून गेली होती. शिवाय आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्यामुळे तो फायदाही भाजपला मिळण्याची आशा आहे. 
मागच्या निवडणुकीत़़़
लोकसभा निवडणुकीत 50 हजारांचे मताधिक्य होते. तर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार गावीत यांनी काँग्रेसचे कुणाल वसावे यांचा 40 हजार मतांनी पराभव केला होता.  
आघाडी । प्लस पॉईंट काय आहेत?
नंदुरबार शहरात काँग्रेसने घेतलेली मेहनत, शेवटच्या टप्प्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या झालेल्या सभा आणि घेतलेली मेहनत पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शिवाय गावोगाव प्रचारावर दिलेला भर.
आघाडी । वीक पॉईंट काय आहेत?
  एकाही स्टार प्रचारकाची न घेतलेली सभा, राहुल गांधी यांची जाहीर झालेली सभा ऐनवेळी रद्द होणे, शहादा तालुक्यातील तापी पट्टयातील गावांमध्ये कमी मेहनत.
2014 च्या 
लोकसभा निवडणुकीत 64.23 टक्के मतदान झाले होते. ते तोर्पयतच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक होते.
2019 च्या 
निवडणुकीत 62.39 टक्के मतदान झाले. त्यात पुरुषांचे 1,09,447 तर महिलांचे 1,00,299 इतके मतदान झाले आहे.

Web Title: On whose path the voting of Nandurbar assembly constituency falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.