देशसेवक सैनिकाप्रती व्यक्त कराया ‘आदरभाव’ जमला सारा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:47 IST2020-02-10T12:47:08+5:302020-02-10T12:47:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील ...

 The whole village gathered to express 'respect' for the patriotic soldiers | देशसेवक सैनिकाप्रती व्यक्त कराया ‘आदरभाव’ जमला सारा गाव

देशसेवक सैनिकाप्रती व्यक्त कराया ‘आदरभाव’ जमला सारा गाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गावातून मिरवणूक काढत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
आसाणे येथील अनेक युवक देशसेवा करण्यासाठी सैन्यदलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकीच एक असलेले महेशकुमार पंडित पाटील हे १७ वर्षांची सेवा बजावून सैन्य दलातून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी त्यांची भव्य शोभायात्रा काढली. सजविलेल्या उघड्या जीपमधून गावभर त्यांची मिरवणूक काढली. जीपवर स्वत: जवान महेशकुमार यांच्यासह त्यांची आई व पत्नी देखील होते. घरोघरी त्यांची औक्षण करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्टÑवादीचे डॉ.अभिजीत मोरे, बाजार समितीचे माजी सभापती युवराज पाटील, उपसभापती हरिदादा पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, अखिल भारतीय लोणी मराठा समाजाचे मनोज शेलार, सुरेश भदाणे, ज्ञानेश्वर पाटील, भरत सावंत, नंदुरबारचे नगरसेवक रघुवंशी, धमेंद्र माळी, विशाल माळी, जगदीश सोनवणे, उमेश पांढारकर, राजेंद्र धनगर, वन परिमंडळ अधिकारी पी.एस.पाटील, मुख्याध्यापक एल.एच.पाटील, रवींद्र कंचन पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, रवींद्र के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विजय चौधरी, अभिजीत मोरे, गजेंद्र शिंपी, हरिदादा पाटील, सुरेश भदाणे, धर्मेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला महेश पाटील यांनी उत्तर देत प्रत्येक जवानाविषयी देशवासीयांची ही भावना राहिली तर प्रत्येक तरुण देशसेवेत जाण्यासाठी नक्कीच तयार होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. ग्रामस्थ, विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांचा उत्साह यावेळी मोठ्या प्रमाणावर दिसून आला. कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय लोणी मराठा समाज, दगडू देव युवा मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, पवनपूत्र मित्र मंडळ, जयभद्रा मित्र मंडळ आणि ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.

Web Title:  The whole village gathered to express 'respect' for the patriotic soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.