आम्हाला डॉक्टर व्हायचे पण शिकविणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:36 IST2020-01-31T12:36:23+5:302020-01-31T12:36:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे ...

आम्हाला डॉक्टर व्हायचे पण शिकविणार कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे आम्हाला डॉक्टर-इंजिनिअर व्हायचे पण इंग्रजी शिकवणार कोण? असा सवाल विद्यार्थ्यांनी नंदुरबार येथील प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार येथील आदिवासी विकास प्रकल्प गाठून समस्यांचा पाढा वाचला. शैक्षणिकदृष्ट्या इंग्रजी विषय हा महत्त्वाचा असून विषय शिक्षक असून ते शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन पुढील भविष्यही धोक्यात आले आहे. हा प्रकार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर येथे मागील शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून सुरू आहे. नववी व दहावीच्या इंग्रजी विषयाचे विषय शिक्षक मुख्याध्यापक एम.जी. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु ते इंग्रजी विषय शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले व पालकांनी झालेल्या ग्रामसभेत हा सर्व प्रकार सांगितल्यावर संबंधित विषय शिक्षकाचे पितळ उघडे पडले. सरपंच, शिक्षण व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत नंदुरबार प्रकल्प कार्यालय गाठला व आपली समस्या मांडली.
दहावीच्या विद्यार्थ्यांची येत्या मार्च महिन्यात परीक्षा सुरू होणा आहे. मात्र आजपर्यंत संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांना काहीही शिकवलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेत काज लिहीतील? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आदिवासी विकास विभागाने संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, आम्हाला इंग्रजी विषय शिकायला मिळाला नाही. परंतु येणाºया नवीन दहावीच्या विद्यार्थ्यांना तरी तो शिकविला जावा, अशी अपेक्षाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.