नंदुरबारात पांढरा नाग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:41 IST2020-09-02T13:41:01+5:302020-09-02T13:41:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हिल परिसरातून सर्पमित्र चेतन वसईकर यांनी पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग पकडून त्याला जीवदान देत ...

नंदुरबारात पांढरा नाग...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हिल परिसरातून सर्पमित्र चेतन वसईकर यांनी पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग पकडून त्याला जीवदान देत वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडण्यात आले.
शहरातील कोकणी हिल परिसरातील रहिवासी संजू दयाराम वसईकर यांच्या घरात हा नाग निघाला. त्यांनी लागलीच सर्पमित्र चेतन वसईकर यांना फोन केला. त्यांनी लागलीच तेथे गेले. सापाला पाहिल्यावर तो पांढºया रंगाचा दुर्मीळ नाग असल्याचे लक्षात आले.
या जातीचे सर्प हे फारसे आढळून येत नाहीत. गेल्या १५ वर्षात त्यांना तिसऱ्यांदा पांढºया रंगाचा नाग आढळून आला. त्यामुळे या प्रजातीचे आपण रक्षण केले पाहिजे यासाठी त्यांनी नागाला कौशल्याने पकडून वन विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल मनोजकुमार रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागात सोडण्यात आले. नागरिकांनी चेतन वसईकर यांचे यांचे कौतुक करून आभार मानले.