कोठली राममंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:37 IST2020-05-12T12:37:32+5:302020-05-12T12:37:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथील राममंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कृष्णमूर्ती आणि साडेदहा हजार रुपयांचा मुद्देमाल ...

कोठली राममंदिरात चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथील राममंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कृष्णमूर्ती आणि साडेदहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़
कोठली येथील राममंदिर लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आले आहे़ परंतू पुजारी प्रमोद वसंत जोशी हे नियमित पूजन करुन विधीवत धार्मिक उपक्रम पार पाडतात़ शुक्रवारी नियमित मंदिर बंद करण्यात आले होते़ दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता़ चोरट्यांनी मंदीरातील सुमारे साडे दहा हजार रुपये किमतीच्या साउंड सिस्टिम व कृष्ण मूर्ती चोरुन नेली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी कोठली गावात भेट देत पाहणी केली होती़ याप्रकरणी प्रमोद जोशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़