लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना अनुसूचित जमातीच्या दर्जाची खात्री करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:42+5:302021-04-11T04:29:42+5:30

याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी आदिवासी विकासमंत्र्यांच्या उपस्थितीत खावटी अनुदान योजनेचा आढावा ...

When determining the list of beneficiaries, ensure the status of the Scheduled Tribes | लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना अनुसूचित जमातीच्या दर्जाची खात्री करा

लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना अनुसूचित जमातीच्या दर्जाची खात्री करा

याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी आदिवासी विकासमंत्र्यांच्या उपस्थितीत खावटी अनुदान योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत चर्चेदरम्यान आदिवासी जमातीअंतर्गत नामसादृशाचा फायदा घेणारा समुदाय सर्वच भागांमध्ये वास्तव्यास असल्याने लाभार्थ्यांची अंतिम करीत असताना काळजी घेण्याकरिता संशयास्पद लाभार्थ्यांची यादी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडील अभिप्राय घेऊन अंतिम करण्याबाबत निर्देश आदिवासीविकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नामसादृश फायदा घेणाऱ्या समुदायाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. या विभागातील सातही प्रकल्पांत कोकणा, कातकरी, म. ठाकूर, क. ठाकूर, का. ठाकूर, महादेव कोळी, मल्हारी कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, पारधी इत्यादी आदिवासी जाती आढळून येतात. यातील काही जमातींचे लोक नामसादृशाचा फायदा घेऊन खावटी योजनेचा लाभ घेण्याची दाट शक्यता व्यक्त करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा संशयास्पद लाभार्थ्यांची त्याच्या अनुसूचित जमातीबाबतच्या दर्जाची खात्री करण्यासाठी सहआयुक्त, अनुसूचित जमाती पडताळणी समितीचे अभिप्राय घेऊन त्यानंतर लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सातही प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Web Title: When determining the list of beneficiaries, ensure the status of the Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.