एसटी बसचे चाक थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:50+5:302021-04-10T04:29:50+5:30
नंदुरबार : सध्या नंदुरबार आगारातील एसटी बसचे चाक लॉकडाऊनमुळे थांबले आहे. लॉकडाऊनमुळे या आगाराला गत वर्षभरात जवळपास एक कोटी ...

एसटी बसचे चाक थांबले
नंदुरबार : सध्या नंदुरबार आगारातील एसटी बसचे चाक लॉकडाऊनमुळे थांबले आहे. लॉकडाऊनमुळे या आगाराला गत वर्षभरात जवळपास एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने १ ते १५ एप्रिलपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीदेखील होत आहे. याच काळात बसेस बंद ठेवण्याचे आदेश आहेत. परिणामी नंदुरबार आगाराच्या ५२२ पैकी ५०० फेऱ्या बंद आहेत.
यामुळे आगाराचे दररोज सरासरी १० लाख रुपयांचे नुकसान होत आहे. गत १ एप्रिलपासून बसेस बंद आहेत. यामुळे १ ते ९ एप्रिल या नऊ दिवसात सुमारे ९० लाख रुपयांचा फटका नंदुरबार आगाराला बसला आहे.
ज्या २२ फेऱ्या सुरू आहेत त्या केवळ जिल्हाअंतर्गत सुरू आहेत. त्यात नवापूर, शहादा, तळोदा व अक्कलकुव्याचा समावेश आहे. धडगाव हे शहाद्याला जोडले आहे. शहाद्याहून धडगावच्या बसेस येण्या-जाण्याविषयीचे नियोजन होते. सध्या नंदुरबार आगाराच्या बसेस दररोज एक हजार किलोमीटर अंतर कापतात. यातून सुमारे दररोज साधारण २५ हजार रुपये उत्पन्न मिळते.
नंदुरबार आगारात एकूण ११३ बसेस आहेत. एकूण कर्मचारी ६७६ आहेत. त्यात बसचालक २५० तर वाहक (कंडक्टर) २३० आहेत.