गुढी उभारुन मराठी नववर्षाचे ठिकठिकाणी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:39 IST2019-04-07T11:39:14+5:302019-04-07T11:39:31+5:30

नंदुरबार : गुढीपाडव्यानिमित्त नंदुरबारात विविध ठिकाणी गुढी उभारुन नवीन मराठी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले़ नवीन वर्षानिमित्त ...

Welcome to the New Year's Day | गुढी उभारुन मराठी नववर्षाचे ठिकठिकाणी स्वागत

गुढी उभारुन मराठी नववर्षाचे ठिकठिकाणी स्वागत

नंदुरबार : गुढीपाडव्यानिमित्त नंदुरबारात विविध ठिकाणी गुढी उभारुन नवीन मराठी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले़ नवीन वर्षानिमित्त अनेकांनी संकल्प केलेत़ गुढीपाडव्यानिमित्त वाहन, सुवर्ण बाजार तेजीत बघायला मिळाली़ गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी गृहप्रवेश तसेच नवीन वाहन घेण्याकडे आपला कल दर्शवला होता़
दिग्वीजय प्रतिष्ठानतर्फे
तळोद्यात निसर्ग व शिक्षणाची गुढी
तळोदा येथील दिग्विजय सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे शिक्षणाची व निसर्गाची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून निसर्ग व शैक्षणिक साहित्यांची पूजा करून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी निसर्ग देवतेला साकडे घालण्यात आले. या वेळी फुंदीलाल माळी यांनी उपस्थित तरूणांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. प्रतिष्ठानतर्फे दुष्काळाची झळ लक्षात घेता पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जलपात्राचे वाटप करून ‘पशुपक्षी वाचवा अभियानाची’ सुरूवातही करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिग्विजय माळी, उपाध्यक्ष नितीन वाणी, अक्षय जाधव, दिनेश पाडवी, संतोष सोनवणे, उमेश पाडवी, जगदीश सूर्यवंशी, सौरव शुक्ला, दीपक लोहार, परीस कलाल, लकेश कलाल, ललीत पवार, पंकज ठाकरे, अभय सूर्यवंशी व नागरिक उपस्थित होते.
हिंदू जनजागृती समितीतर्फे
सामूहिक गुढी उपक्रम
नंदुरबार तालुक्यातील वावद व ढंढाणे येथे सामूहिक गुढी उभारण्याचे नियोजन करण्यात आले. हिंदू जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी गुढीपाडव्याचे शास्त्रीय महत्व सांगितले. वावद येथे सुदाम पाटील यांनी तर ढंढाणे येथे नाना ओगले यांनी गुढीपूजन केले. गुढीपूजनाचे पौरोहित्य निवेदिता जोशी यांनी केले. शेवटी हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. विशेष म्हणजे वावद येथील तरुणांनी गावात दवंडी देऊन सर्वांना निमंत्रण दिले. तसेच वावद येथील सामाजिक कार्यकर्त्या लुळे यांनी मंदिर परिसरात रांगोळी काढली होती. या उपक्रमात वयोवृद्धांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
राष्टÑीय स्वयंसेवक संघातर्फे
शहाद्यात संचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहादा शाखेतर्फे शनिवारी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शहरातून संचलन काढण्यात आले. टिळक चौकातून निघालेले हे संचलन शहरातील विविध भागातून काढण्यात आले. त्यानंतर गणपती मंदिरात गुढीपाडवा उत्सव घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून तालुका संघचालक डॉ.हेमंत सोनी, डॉ.सचिन चौधरी तर प्रमुख वक्ते म्हणून जयंत उत्तरवार उपस्थित होते. यावेळी उत्तरवार म्हणाले की, हिंदू संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरु होत असल्याने या उत्सवास अनन्यसाधारण महत्व आहे. हा उत्सव संपूर्ण देशात वेगवेगळ्या नावाने ओळखला व साजरा केला जातो. या वेळी माजी तालुका संघचालक भगवानदास अग्रवाल, अजय शर्मा, हिरालाल बोरदेकर, डॉ.वसंत अशोक पाटील, रोहन माळी व स्वयंसेवक उपस्थित होते.
शिव पिपलेश्वर मंडळ खेतिया
खेतिया येथील शिव पिपलेश्वर मित्र मंडळातर्फे गुढीपाडव्याच्यानिमित्त यंदाही पक्ष्यांसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते म्हणून मंडळातर्फे खेतिया येथील सुभाष मार्ग, अशोक रोड, मणियार गल्ली, गांधी चौक व विविध ठिकाणी मातीपासून तयार केलेली २०० पेक्षा जास्त मातीची भांडी वाटप करण्यात आले. आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर (गच्चीवर) या भांड्यात पाणी भरून ठेवून पक्ष्यांसाठी एक सेवा म्हणून कार्य करावे व पक्ष्यांचे प्राण वाचवून त्यांची मदत करावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. या वेळी मंडळाचे सदस्य विजय चौधरी, अनिल बडगुजर, किशोर चौधरी, विनोद सोनवणे, शेखर चौधरी, राकेश चौधरी, बबलू चौधरी, विनोद शिरसाठ, राकेश पोद्दार, गोविंदा चौधरी, गोलू कोळी, कमलेश चौधरी, धनराज चौधरी, अशोक महाराज, उत्तम चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Welcome to the New Year's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.