संत दगा महाराज दिंडीचे शहरात जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:16 IST2019-04-11T12:15:59+5:302019-04-11T12:16:05+5:30
चौपाळे ते आशा : यंदाचे २६ वे वर्ष

संत दगा महाराज दिंडीचे शहरात जल्लोषात स्वागत
नंदुरबार : चौपाळे ता.नंदुरबार येथून निघालेल्या संत दगाजी महाराज यांच्या पालखी दिंडीचे शहरात जल्लोेषात स्वागत करणत आले़ चौपाळे ते समाधीस्थळ आशा (गुजरात) यादरम्यान काढलेल्या या दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत़
संत दगा महाराज यांच्या स्मृतीनिमित्त भक्तपरिवाराकडून चौपाळे ते आशा ही पायी दिंडी काढण्यात येते़ दिंडीचे यंदाचे २६ वे वर्ष आहे़ बुधवारी सकाळी चौपाळे येथून निघालेल्या दिंडीचे शहरातील मोठा मारुती मंदिरात आगमन झाले. याठिकाणी संतोष चैैतन्य महाराज यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित दिली़ दिंडीचे चौधरी व रघुवंशी परिवाराकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील विविध मार्गावरुन दिंडी मार्गस्थ झाली़ जागोजागी दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने शहरात चैैतन्य निर्माण झाले होते़ सहभागी भाविक सात दिवस पायी चालून १७ एप्रिल रोजी गुजरात राज्यातील आशा येथील निलोर्भी आश्रमात पोहोचणार आहे़ याठिकाणी १८ एप्रिल रोजी सकाळी नर्मदा नदीचे पूजन, जलाभिषेक व संत दगा महाराजांची आत्मज्योत विसर्जन करण्यात येऊन पादुका पूजन होणार आहे़ राम नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात हे भाविक रवाना झाले आहेत़