हमसे का भूल हूई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:32 IST2020-08-01T12:31:56+5:302020-08-01T12:32:08+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले ...

हमसे का भूल हूई...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले असते, सदस्यांची बैठक कधी झाली, एकमताने कधी ठरविले गेले याबाबतचा खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त करीत सभापती अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना लेखी पत्र दिले. त्यामुळे विषय समिती बदलाबाबतची चर्चा रंगली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या बदलाचा निर्णय शुक्रवारच्या सर्वसाधारणत बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेची सुरुवातीपासूनच अर्थ व बांधकाम समिती मिळावी यासाठीची मागणी होती. परंतु सत्ता स्थापनेच्या वेळी ऐनवेळी घडामोडी होऊन काँग्रेस-सेनेची युती झालेली असतांना त्यात भाजपचे नेते दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री दिपक पाटील यांनी एण्ट्री करीत सभापतीपद मिळविले. शिवाय शिवसेनेला दुय्यम दर्जाचे कृषी व पशुसंवर्धन या समित्या देण्यात आल्या. आणखी एक सभापतीपद किंवा बांधकाम व अर्थ समिती या दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नाराज होते. गेल्या पाच महिन्यात ही नाराजी लपून राहिली नाही.
गेल्या वेळच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे काही सदस्य व शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहून तांत्रिकदृष्टया अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अध्यक्षांना अर्ध्यातून सभा सोडावी लागून ती स्थगित करण्यात आली होती. त्याचवेळी यापुढे आणखी घडामोडी घडतील हे स्पष्ट झाले होते. अखेर राजकीय घडामोडी घडून शिवसेनेकडे बांधकाम समिती देण्याचा निर्णय झाला. घडामोडी होतांना काँग्रेस, शिवसेना यांनी भाजपलाही विश्वासात घेतल्याचे आजच्या चित्रावरून स्पष्ट होते. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सभेपूर्वी दुपारी दिलेल्या स्रेहभोजनाला भाजपचेही सदस्य उपस्थित राहिले. शिवाय विषय समिती बदलाचा विषय निघाला त्यावेळी देखील काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्टÑवादीचे सदस्य देखील शांत होते. त्यामुळे हा विषय एकमताने मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे याचवेळी सभापती पाटील यांनी आपले म्हणने रेकॉर्डवर घेण्याची सुचना केली. शिवाय अध्यक्षांना लेखी पत्रही दिले. त्याची उत्तरे मिळावी अशी मागणी केली.
अभिजीत पाटील यांची राजकीय पार्श्वभुमी वडिल शहाद्यात भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्याचे वलय पहाता त्यांना सभापतीपदही मिळाले आहे. परंतु विषय समिती बदलाच्या वेळी त्यांना विश्वासात न घेतले गेल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आजचा निर्णय एकमताने झाला असल्याचे बोलले जात असले तरी अभिजीत पाटील यांची खदखद कायम आहे. जिल्हा परिषदेत सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत. काँग्रेसला अध्यक्ष व दोन सभापती, शिवसेनेला उपाध्यक्षपद तर भाजपला एक सभापतीपद दिले गेले आहे. राष्टÑवादीचे तीन सदस्य भाजपाच्या गटात आहेत. त्यामुळे येथे विरोधीपक्षच कुणी नसल्याची स्थिती आहे.