बारमाही चारा उत्पादनातून स्वावलंबनाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:58 IST2018-06-14T11:58:18+5:302018-06-14T11:58:18+5:30

Way of self-reliance from perennial fodder products | बारमाही चारा उत्पादनातून स्वावलंबनाचा मार्ग

बारमाही चारा उत्पादनातून स्वावलंबनाचा मार्ग

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळ आणि नापिकीने घेरलेल्या विविध भागातील 333 शेतक:यांना पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास योजनेंतर्गत बारामाही चारा उत्पादनाचा नवा मार्ग सापडला आह़े एक वेळ पेरणी केलेल्या चारा बियाण्यातून वर्षभर चारा उत्पादन घेता येत असल्याने शेतक:यांचे अर्थकारण गतिमान होत आह़े 
‘न्यूट्रीफीड’ असे गवताच्या संकरित चारा वाणाचे नाव असून शासनाच्या विविध संशोधन संस्थांद्वारे संशोधन करून तो विकसित करण्यात आला आह़े गेल्या वर्षात जिल्ह्यातील 333 शेतक:यांना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने न्यूट्रीफीड बियाण्याचे वाटप केले होत़े यापूर्वी होत असलेल्या मका बियाणे आणि गवताचे एक वेळ उत्पादन येऊन पुन्हा नव्याने पेरणी करावी लागत होती़ यातून शेतक:यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती़ परंतु यंदा पशुसंवर्धन विभागाने ‘न्यूट्रीफीड’ खरेदी करण्यासाठी लाभार्थी शेतक:यांना निधी दिला होता़ 2017-18 मध्ये वाटप झालेल्या या बियाण्यातून आतार्पयत 6 वेळा शेतक:यांकडून चारा कापणी झाल्याने उन्हाळ्यातही हिरवागार चारा उपलब्ध होत आह़े 
येत्या वर्षातही शेतक:यांना न्यूट्रीफिड वाटप करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाचे आह़े जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत येत्या वर्षात किमान 500 शेतक:यांना न्यूट्रीफीड खरेदीसाठी निधी मिळणार आह़े 2017-18 या वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 333 लाभार्थीना न्यूट्रीफीड चार बियाणे खरेदीसाठी  2 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यात प्रती लाभार्थीला 600 रुपये खरेदी अनुदान देण्यात आल़े शहादा 135, नवापूर 98, नंदुरबार 100 अशा 333 लाभार्थीना प्रत्येकी 950 ग्रॅम बियाण्याची एक बॅग खरेदी करून देण्यात आली़ गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यार्पयत पेरणी झालेल्या चारा बियाण्यातून शेतक:यांना 45 दिवसानंतर तब्बल 250 टन चारा उपलब्ध झाला़ या चा:याला एका फेरीत 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम मिळत असल्याने त्यांचे मासिक उत्पन्न सुरू झाले आह़े 
जिल्ह्यात आजअखेरीस पेरणी करण्यात आलेल्या 770 किलोग्रॅम बियाण्यातून वेळोवेळी चा:याची निर्मिती होत  असली तरी येत्या वर्षअखेरीस जिल्ह्यात 333 शेतक:यांच्या क्षेत्रातून 77 हजार मेट्रिक टन चारा निर्मिती होऊन त्याची विक्री होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े कोणत्याही प्रकारच्या कीडरोगापासून मुक्त असलेल्या  या चा:याच्या वाणाला सरी किंवा वरंबा अशा दोन्ही पद्धतीत पेरता येत़े साधारण 3 ते 5 सेंटीमीटर्पयत त्याची पेरणी करण्यात येऊन पाणी देऊन त्याचे संगोपन शेतक:यांनी केले होत़े सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या खतांची मात्रा दिल्या गेल्याने चारा बियाण्याची जोमदारपणे वाढ झाली होती़ कमी पाण्यात फुललेल्या या चा:यामुळे शेतक:यांना ऐन उन्हाळ्यातही उत्पादन घेता येणे शक्य झाले होत़े या चारा उत्पादनासाठी पशुसंधर्वन विभागाने कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाची मदत घेऊन बियाणे प्राप्त लाभार्थी शेतक:यांना मार्गदर्शन केले होत़े यातून शेतक:यांनी लागवड पद्धतीत बदल केल्याने शेतक:यांना प्रत्येक कापणीवेळी एकरी 250 टन किंवा त्यापेक्षा अधिक हिरवा चारा मिळत आह़े चारा विक्रीतून लाभ मिळत असल्याने यंदा 478 शेतक:यांनी संपर्क करून चारा लागवडीची तयारी दर्शवली आह़े येत्या वर्षात जिल्हा वार्षिक योजना आणि कामधेनू ग्राम दत्तक योजना यातून 2 लाख 86 हजार रुपयांना मंजुरी मिळणार आह़े यात नंदुरबार 112, नवापूर 112, शहादा 85, धडगाव 85, अक्कलकुवा 56, तर तळोदा तालुक्यातील 28 अशा 478 लाभार्थीना बियाण्याचे वाटप होणार आह़े शहादा तालुक्यातील आडगाव येथील दारासिंग रावताळे यांनी 1 एकरात चारा बियाण्याची पेरणी केली आह़े यातून त्यांना येत्या 20 दिवसात 10 टनांर्पयत चारा उत्पादन येण्याची शक्यता आह़े त्यांनी सांगितले की, महिन्याकाठी येणा:या चारा उत्पादनाला खरेदी करण्यासाठी मध्य प्रदेशातून पशुपालकांनी संपर्क केला आह़े शहादा तालुक्यातीलच खरगोन येथील दिलीप नावडे यांनी 1 एकर क्षेत्रात चारा बियाणे पेरले आह़े त्यांच्याकडून लागवड केलेल्या चारा बियाण्याच्या कापणीची वेळ जवळ येत आह़े त्यांनाही एका वेळेस साधारण 20 टनार्पयत चारा उत्पादन मिळण्याची अपेक्षा आह़े 

Web Title: Way of self-reliance from perennial fodder products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.