निर्यात होत नसल्याने शेताततच वाया जातेय टरबूजचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:36 IST2020-04-13T12:35:37+5:302020-04-13T12:36:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची ...

Watermelon crop is wasted in the field due to no export | निर्यात होत नसल्याने शेताततच वाया जातेय टरबूजचे पीक

निर्यात होत नसल्याने शेताततच वाया जातेय टरबूजचे पीक

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची वाया गेली असून, हाता तोंडाशी आलेले पीक शेतातच पडून राहिल्याने लाखो रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकºयांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकवर आपल्या शेतातच मिळेल त्या भावाने विक्री करण्याची वेळ आली आहे.
ब्राह्मणपुरीसह सुलतानपूर परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे टरबूज काही प्रमाणावर घेत असतात. त्याचबरोबर पीकदेखील आले. परंतु नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना विषाणुच्या व्हायरसमुळे संपूर्ण देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीला ही टरबूज कोणी घेण्यास तयार नाहीत.
लाखो रूपयांचे उत्पन देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकºयाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणून शेतकºयांनी कुणी एक एकर कुणी दोन एकर तर कोणी चार एकर टरबूज पिकाची लागवड हजारो रूपये खर्च करून केली. यंदा उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, बाजारपेठ थंड झाली.
शेतकरी बांधवांच्या शेतावर येऊन पीक घेऊन जाणारे व्यापारी मातीमोल किमतीने पीक घेऊ लागले आहे. आठ ते दहा रूपये किलोने घेणारे टरबूज पीक आता चार ते पाच रूपये किलो मागू लागले आहेत. शेतकरी बांधवांना टरबूज तोडायला लावून ते घेऊन न जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या हंगामात कोरोनाचा शेतºयांना जबर फटका बसला असल्याने लागवडीचा तरी खर्च निघायला पाहिजे या उद्देशाने मिळेल त्या भावाने शेतातच विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाकडून मालवाहतुकीचा परवाना मिळाला. परंतु व्यापारी माल नेण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे शेतकरी वेगळ्याच संकटात सापडला आहे. टरबूजपासून उत्पन्न नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काहींनी शेतातच उभ्या पिकांत रोटर फिरवला आहे.

Web Title: Watermelon crop is wasted in the field due to no export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.