लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून दऱ्या खोºयातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत़ शुक्रवारी नद्यांसह छोट्या-मोठ्या नाल्यांनाही पूर आल्याचे दिसून आले होते़शुक्रवारी वालंबा, दहेल, डाब, काठी, आसनबारीपाडा यासह विविध ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत होते़ फेसाळणाºया या धबधब्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दुर्गम भागात आल्याचेही यावेळी दिसून आले़ दुर्गम भागातील दहेल नदीवरील धबधबा पर्यटकांसोबत मोठे आकर्षण आहे़ शुक्रवारी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहू लागला होता़ खोल हिरव्यागार डोंगरावरून दरीत कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी लगतच्या गुजरात राज्यातून अनेकजण आल्याची माहिती देण्यात आली़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी पर्यटनस्थळे बंद असल्याने शनिवार आणि रविववार अशा जोडून सुट्यांच्या दिवशी गुजरात राज्याच्या विविध भागातील पर्यटक सातपुड्यात येत आहेत़ यात नर्मदा काठावर बोटींग आणि बार्जमधून फेरफटका मारणारेही दिसून येत आहेत़ सोयी सुविधांचा अभाव असला तरीही गेल्या काही वर्षात वर्षापर्यटनासाठी सातपुड्याला पसंती दिली जात आहे़ लांबवरून पर्यटक येथवर येत आहेत़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी झाली असली तरी नवीन पर्यटकांची संख्याही अधिक आहे़यात प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातून आणि गुजरातमधील पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ यामुळे स्थानिक किरकोळ खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय आणि इतर व्यवसायांना लाभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
सातपुड्यातील धबधबे ओसंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:49 IST