आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:08 IST2018-04-10T12:08:57+5:302018-04-10T12:08:57+5:30

आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या कोळदा, लहान शहादे, समशेरपूर आदी गावांमध्ये प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े विशेषत कोळदा गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी आठवडय़ातून केवळ एकच दिवस तेही तासभर पाणी येत असत़े त्यातच पाण्याचा दाबसुध्दा कमी असल्याने एक कळशी भरण्यासाठी साधारणत पाऊन तास लागत असतो़ त्यामुळे तोवर इतर ग्रामस्थांकडून भांडय़ांच्या रांगा लावण्यात येतात़ या गावात पाणी योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आह़े सोबत पावसाचेही प्रमाण अत्यल्प असल्याने या गावाला दुष्काळाचे वरदानच लाभले असल्याचे ग्रामस्थ खेदाने सांगतात़
दरम्यान, या ठिकाणची पाणी पातळी सुमारे 900 फुटांर्पयत खोल गेली आह़े त्यामुळे कुपनलिका करणेही ग्रामस्थांना जोखमीचे ठरत आह़े पाणी नाही लागले तर कुपनलिकेसाठी लागणारा खर्चही वाया जाण्याची भिती असत़े परिसरात हातपंपाची संख्याही कमी आह़े परिणामी एका हातपंपावर 40 ते 50 ग्रामस्थांची गर्दी होताना दिसून येत असत़े
त्यामुळे काही वेळा पाणी भरण्याच्या वादातून ग्रामस्थांमध्येच वाद होतानाही दिसून येतात़
गावात पाणीटंचाई असल्याने येथील महिलांकडून पाण्यासाठी लगतच्या गावात वणवण करण्यात येत असत़े भर उन्हात डोक्यावरुन पाण्याचे भांडी वाहून न्यावे लागत असत़े