पालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:24 IST2019-07-30T12:24:32+5:302019-07-30T12:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या जलस्तरात वाढ होत असल्याने विरचक प्रकल्पाच्या जलसाठय़ात वाढ होणार आह़े ...

पालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या जलस्तरात वाढ होत असल्याने विरचक प्रकल्पाच्या जलसाठय़ात वाढ होणार आह़े या पाश्र्वभूमीवर पालिकेने घेतलेला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागे घेतला आह़े
पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकानुसार 1 ऑगस्टपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला होता़ परंतू पावसामुळे विरचक प्रकल्पाच्या साठय़ात वाढ होत असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आह़े दरम्यान शहराला पाणीपुरवठा होणा:या विरचक प्रकल्पातील गाळ न काढला गेल्याने टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता़ हा आरोप पालिका पदाधिका:यांनी खोडून काढत गाळ काढण्याचा निर्णय हा शासनाकडून घेण्यात येतो़ धरण कोरडे झाल्यावरच गाळ काढणे शक्य होत़े परंतू विरचक प्रकल्पात मृतसाठा असल्याने गाळ काढण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी म्हटले आह़े