शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

खातगाव परिसरात ‘जलयुक्त’मुळे पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवापूर तालुक्यातील खातगाव, श्रावणी व निंबोणी या गावात जलयुक्त शिवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवापूर तालुक्यातील खातगाव, श्रावणी व निंबोणी या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या गाव परिसरात अनेक बंधा:यात पाणी दिसून येत आहे. दरम्यान, परिसरातील 10 गावातील विहिरींमध्ये जल पुनर्भरणाचाही फायदा शेतक:यांना होत असून, परिसरातील भूजल पातळीत सुमारे 150 मीटरने वाढ झाल्याचे चित्र असून, परिसरातील 184 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. श्रावणी, ता.नवापूर येथे भात, गहू, सीताफळ, साग व कडीपत्ताची लागवड करण्यात आली आहे. श्रावणी येथे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 15 लक्ष रुपये खचरून बांधण्यात आलेल्या नऊ ठिकाणी 20 मीटर बाय दीड मीटर उंचीचे गॅबियन बंधारा बांधल्यामुळे परिसरातील किमान 10 विहिरींचे पुनर्भरण करण्यात आल्याचे मृद व जलसंधारण अधिकारी एम.वाय. शेख व कृषी सहायक प्रशांत पाटील यांनी सांगितले. खातगाव येथील 175 मीटर लांबीच्या नाल्यातून पाच हजार 769 घनमीटर गाळ काढून तो परिसरातील शेतक:यांच्या शेतात टाकला, गाळ काढल्यामुळे नाल्यात 5.77 टी.सी.एम. पाणी साठय़ात वाढ झाली. तसेच परिसरात मजगीचे काम केल्यामुळे मजगीच्या शेतातील पाण्याचा प्रवाह कमी कमी केल्यामुळे एक हेक्टर क्षेत्रात सात टीसीएमर्पयत पाणी अडविले जाते, असेही प्रशांत पाटील यांनी सांगितले.खात गाव येथील शेतकरी चेच्या महान्या गावीत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सहा एकर शेती असून, विहिरीच्या पाण्यावर बागायत शेती करतो. या शेतीत ऊस, तूर, भात, मका व मिरचीचे पीक घेतो. शेताजवळील जलयुक्त शिवार कामांमुळे विहिरीच्या पाण्याची तीन मीटरने वाढ झाली आहे. उन्हाळ्यात सुद्धा विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होणार नसल्याचे सांगितले. विहिरींची खोली 35 फूट असून, त्यात 18 फूट पाणी असल्याचेही सांगितले. खातगाव येथील सरपंच करणसिंग पाच्या वसावे, उपसरपंच ज्योतीबाई वसावे यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, खातगावमध्ये जलयुक्त शिवाराच्या नालाखोलीकरण, मातीनालाबांध, सिमेंट बंधारे, सी.सी.टी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन साठवण बंधारे व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विहिरी पुनर्भरण झाल्यामुळे या परिसरात किमान 112 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.जलयुक्त शिवार कामातून बंधा:यात जमा झालेल्या पाण्याचा वापर करून परिसरातील शेतकरी सिंचन शेती करत असून, पाण्याचा वापर कमी करावा यासाठी गावक:यांना सूचनाही देण्यात आल्याचे सांगितले. एकूणच जिल्ह्यात राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे विहिरींची पाणी पातळी वाढणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणे, त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध होण्यासह अनेक गावांमध्ये खरिपाबरोबरच रब्बीच्या पिकांनाही मदत झाल्याचे दिसून येते.