खरवड येथे 500 फुटांर्पयत पाणी पातळी खोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:40 IST2018-05-07T12:40:43+5:302018-05-07T12:40:43+5:30
अनेक ठिकाणी कुपनलिकाही आटल्या

खरवड येथे 500 फुटांर्पयत पाणी पातळी खोल
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरातील पाणी पातळी खालावली आह़े खरवड, खेडले, त:हावद आदी गावांमध्ये पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थांकडून पाण्यासाठी वणवण करण्यात येत आह़े
परिसरात ऊस, केळी आदी पिके घेण्यात आली आहेत़ परंतु पाण्याअभावी पिक करपत असल्याची व्यथा शेतक:यांकडून मांडण्यात येत आह़े ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात परिसरातील महिला तसेच लहान मुल पाण्याच्या कळशा, भांडी घेऊन जाताना दिसून येत असतात़ सुरुवातीलाल 100 फुटांर्पयत खोल गेलेली पाण्याची पातळी आता पाचशे फुटांर्पयत खोल गेल्याने ग्रामस्थ पाण्याअभावी बेजार झाले आहेत़ खरवड, खेडले व त:हावद या गावांची परिस्थिती अत्यंत वाईट आह़े या परिसरात विहिरीदेखील नाहीत़ परिणामी जलस्त्रोत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आह़ेपरिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आहेत. परिसरात विहिरी नसल्याने ग्रामस्थ तसेच शेतक:यांकडून ठिकठिकाणी कुपनलिका करण्यात आल्या आहेत़ परंतु त्यांचीसुध्दा पाणीपातळी खोल गेल्याने त्या आटल्या आहेत़
कृषिपंपातून पाणी पूर्ण क्षमतेने येत नसल्याने येथील पिक धोक्यात आली आहेत़ त्यामुळे साहजिकच पाण्यासाठी शेतक:यांकडून जुळवाजुळव करण्यात येत आह़े यंदा या ठिकाणी जलयुक्त शिवारची मोठी कामे झालेली आहेत़ त्यामुळे भविष्यात याचा फायदा होणार असल्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आह़े हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा वेळेत मान्सून दाखल होणार आह़े परंतु तरीसुध्दा अजून उन्हाळ्याचा साधारणत दीड महिना काढायचा असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या ठिकाणी बराचसा परिसर हा सपाटीवर आह़े त्यामुळे साहजिकच येथे पाण्याची पातळी खालावत असत़े कृषिपंपातून अत्यंत कमी दाबाचे पाणी येत आह़े त्यातच अनेक वेळा महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो़
त्यामुळे शेतक:यांना अजूनच समस्यांचा सामना करावा लागत असतो़ अनेकवेळा जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामस्थ, अबालवृद्धांना पाण्यासाठी हातपंपावर दिवसभर रांगा लावाव्या लागत आहे.
ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्यासाठी फिरफिर होत असल्याने साहजिकच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक पशुपालकांचे पाण्यासाठी स्थलांतर झाले आहेत़
ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी जाण्यास पशुपालक पसंती देत असतात़ अनेक पशुपालकांना आपली जनावरे विकण्याचीदेखील वेळ आली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े