शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारवासीयांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील अवघा 41 टक्के पाणीसाठा लक्षात घेता पालिकेने आतापासूनच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील अवघा 41 टक्के पाणीसाठा लक्षात घेता पालिकेने आतापासूनच पाणी पुरवठय़ात काटकसर सुरु केली आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येत्या जानेवारीपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याचे सुतोवाच पालिकेने दिले आहे. यामुळे यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईला काही प्रमाणात सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांनी पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प आणि आंबेबारा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पात यंदा पाणीसाठा होऊच शकला नाही. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे थोडाफार साठा झाला. परंतु तो 42 ते 43 टक्क्यांवर पोहचलाच नाही. सद्यस्थितीत विरचक प्रकल्पात अवघा 41 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा प्रकल्पात 60 ते 70 टक्के पाणीसाठा आहे. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता शहराला येत्या सहा  ते सात महिने पुरेल इतके पाणी आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवन आणि जमिनीत जिरण्याचे प्रमाण पहाता पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीसाठी उपाययोजना केल्या नाही तर पुढील काळात गंभीर संकट उभे ठाकणार आहे.एकदिवसाआड पाणीसध्या नंदुरबारकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पूर्वी पुर्ण एक तास पाणी पुरवठा होत होता. परंतु आता त्यात कपात करण्यात आली असून 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. येत्या काळात त्यात आणखी कपात होण्याची शक्यता पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती असतांना नंदुरबार पालिकेने कधीही आपल्या पाणी पुरवठय़ात खंड पडू दिला नव्हता. यंदा देखील तसा खंड पडू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असली तरी त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक राहणार आहे.दोन दिवसाआडचा निर्णयसध्या वेळेवर आणि वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची किंमत नाही. मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. आपले पाणी भरल्यागेल्यानंतर रस्त्यांवर  पाणी शिंपडणे, अंगण, ओटे, वाहने धुणे असे प्रकार नागरिक करीत असतात. याशिवाय अनेक    भागातील सार्वजनिक नळांना देखील तोटय़ा नसल्यामुळे ते पाणी वाया जाते. काही नागरिकांनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेले आहे या सर्व प्रकारामुळे दररोज किमान एकुण पाणी पुरवठय़ाचा पाच टक्के पाणी वाया जात असल्याचे निरिक्षण पालिकेने केले आहे. हे वाया जाणारे पाणी टाळले गेले नाही तर जानेवारीपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका घेणार आहे. मिटरप्रमाणे पाणीपालिकेने अनेक शासकीय कार्यालये, रुग्णालय यांना मिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला आहे. शहरातील नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता मिटरप्रमाणे पाणी दिलेल्या शासकीय कार्यालये आणि इतरांबाबत पालिकेला फेरविचार करणे भाग आहे. त्यादृष्टीनेही पालिकेने कामाला सुरुवात केली आहे. किमान पाणी टंचाईच्या काळात शहरवासीयांचे हित पहाणे महत्त्वाचे आहे.शहरातील अनेक भागात अवैध नळ कनेक्शन देखील अनेकांनी घेतले आहेत. असे नळ कनेक्शन शोधण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे. त्यामुळे अशा नळधारकांना 15 नोव्हेंबर्पयत नळकनेक्शन वैध करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.शहरात अनेक भागात कुपनलिका देखील आहेत. त्याद्वारे देखील पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक भागात एकदिवसाआड जलकुंभाद्वारे तर एक दिवसाआड कुपनलिकेचे पाणी येते. परिणामी अशा भागात दररोज पाणीपुरवठा होतो. आता कुपनलिकांचे पाणी बंद करून ते उन्हाळ्यात वापरल्यास मदतच होणार आहे.