विहिरींनी तळ गाठल्याने ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:51 IST2019-05-03T11:51:53+5:302019-05-03T11:51:58+5:30
कोळदे शिवार : विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

विहिरींनी तळ गाठल्याने ‘पाणीबाणी’
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कोळदे परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता़ आता एप्रिलमध्ये विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी नसल्याची भिषण स्थिती निर्माण झालेली आहे़ गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे़
या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ या भागात बहुसंख्य ट्युबवेल ५०० ते ७०० फुटापर्यंत आहेत़ परंतु दोन महिन्यांपसाून त्याही आटल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ अद्याप मे महिना काढायचा असताना आतापासूनच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़
पिकांना पाणी देण्याची चिंता
पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येथील शेतकºयांनी जे काही खरिपाची थोडीफार पिक घेतली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे़ या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ सधन शेतकºयांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आहे़ परंतु इतर शेतकºयांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आहे़ मागील वर्षी ऐन पावसाळ्यातदेखील येथील पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते़ परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आहे़ त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे़
पिण्याच्या पाण्याचेही वांधे
ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आहे़ या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ पाण्याच्या शोधात मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आहे़ अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आहे़ परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करुन येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे़
चाºयासाठीही होताय हाल..
पाणी व चाराटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ येथील पशुपालकांना चाºयासाठी इतरत्र वणवण करावी लागत आहे़ पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाºयाचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चाºयाच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचा अद्याप मे महिला बाकी आहे़ त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सध्या तापमानातही वाढ होत आहे़ त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आहे़