२४ तास पाणीपुरवठ्यासाठी वॅाटर ऑडीटला नंदुरबारात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 21:57 IST2020-11-03T21:57:07+5:302020-11-03T21:57:25+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिकेतर्फे २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना तयार करण्यात येत असून त्यासाठी शहरातील वाॅटर ...

Water audit for 24 hours water supply started in Nandurbar | २४ तास पाणीपुरवठ्यासाठी वॅाटर ऑडीटला नंदुरबारात सुरुवात

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी वॅाटर ऑडीटला नंदुरबारात सुरुवात

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  पालिकेतर्फे २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना तयार करण्यात येत असून त्यासाठी शहरातील वाॅटर ऑडीट तयार केले जात आहे. याकरीता बाहेरील संस्था नेमण्यात आली असून घरोघरी जाऊन नळ कनेक्शन विषयी माहिती घेतली जात आहे. एका कुटूंबाला दरडोई किती पाणी लागते त्यानुसार २४ बाय सात ही योजना आकाराला येणार आहे. दरम्यान, ज्यांचे अनधिकृत नळ कनेक्शन असतील त्यांनी ते नियमित अकारणी द्वारेच वैध करून घ्यावे असे आवाहन देखील पालिकेतर्फे करण्यात आले आहे. 
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक धरण गेल्या दोन वर्षांपासून पुर्ण क्षमतेने भरत आहे. याशिवाय आंबेबारा धरण देखील दरवर्षी ओव्हरफ्लो होत आहे. शिवाय शहरात पाण्याची स्टोरेज क्षमता देखील वाढली आहे.  ही बाब लक्षात घेता येत्या काळात शहरात दररोज २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी मात्र वाॅटर मिटर लावले जाणार आहे. त्याचअंतर्गत आता वाॅटर ऑडीट देखील केले जात आहे.
काय आहे योजना
२४ बाय ७ या योजनेअंतर्गत प्रत्येक नळ कनेक्शनधारकास वाॉटर मिटर लावले जाणार आहे. दररोज २४ तास नळांना पाणी राहील अशी व्यवस्था असेल. अर्थात प्रत्येक कुटूंब किती पाणी वापर करते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार आता जेवढा पाणीपुरवठा केला जातो तेव्हढेच पाणी पाणी वापरले तरी हजार रुपयांपर्यंतच पाणी पट्टी आकारणी होण्याची शक्यता आहे. जास्तीचे पाणी वापर झाल्यास तेव्हढा जास्तीचा चार्ज द्यावा लागणार आहे. अर्थात तो कमीच ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात ज्या पालिकांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे तेथे ती यशस्वी झालेली आहे. नागरिकांनी देखील त्याचे स्वागतच केले आहे. नंदुरबारवासीयांच्या पसंतीस देखील ही योजना पडेल अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. 
वाॅटर ऑडीट सुरू
शहरात या योजनेकरीता वाॅटर ऑडीट सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी त्रयस्थ संस्था नेमण्यात आली आहे. या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेत आहेत. एक किंवा एकापेक्षा अधीक कनेक्शन असतील तर त्याचीही पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी या सर्व्हेसाठी सत्य माहिती द्यावी जेणेकरून योजनेचा आराखडा आखण्यास मदत होईल असे आवाहन नगराध्यक्षा रत्ना   रघुवंशी यांनी केले आहे. काही नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतले असल्यास ते अधिकृत करून घ्यावे. त्यासाठी कुठलाही अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही असेही पालिकेने याआधीच स्पष्ट केेले     आहे. 

   ८० लाख लिटर पाणी...
 नंदुरबारातील नळ जोडणीधारकांची संख्या जवळपास १४ हजार ५०० पेक्षा अधीक आहे. या नळजोडणीधारकांना झराळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज किमान ८० लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी पालिकेने शहराच्या चारही बाजूंना जवळपास १५ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

   १५ जलुकुंभद्वारे वितरण
 शहरात सर्वात जुनी पाण्याची टाकी ही साक्रीनाका परिसरातील आहे. याशिवाय टिळक विद्यालयामागे, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ, माळीवाडा, धुळेनाका, बुस्टरपंप, नवनाथ टेकडी, शांतीनगर, योगेश्वरनगर, नागाईनगर, देवमोगरा कॉलनी, परदेशीपुरा टेकडी, विरलविहार, हाटदरवाजा आदी ठिकाणी जलकुंभ आहेत. 
 

पालिकेने टंचाईच्या काळात देखील नियमित पाणी पुरवठा केला होता. आता सुदैवाने दोन वर्षांपासून विरचक धरण पुर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे २४ बाय ७ ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. दररोज २४ तास नळांना पाणी  राहील. मिटर बसविण्यात येईल.  परंतु त्याबाबत गैरसमज करण्याचे कारण नाही. याबाबत काहीजण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतीलही. परंतु योजना नागरिकांच्या हिताचीच आहे. आता वाॉटर     ऑडीट सुरू आहे. त्यासाठी सहकार्य करावे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा.

Web Title: Water audit for 24 hours water supply started in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.