Vidhan Sabha 2019: सोशल मिडीयावरील प्रचारावरही राहणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:03 IST2019-09-26T12:03:07+5:302019-09-26T12:03:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी, कार्यकत्र्यांना संदेश देण्यासह इतर कारणांसाठी फेसबूक व इतर सोशल मिडियाचा मोठय़ा ...

Vidhan Sabha 2019: सोशल मिडीयावरील प्रचारावरही राहणार वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी, कार्यकत्र्यांना संदेश देण्यासह इतर कारणांसाठी फेसबूक व इतर सोशल मिडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर होईल. प्रचार, प्रसार, बदनामीकारक संदेश, व्हिडीओ व्हायरल होऊ नये यासाठी सोशल मिडियाला आचारसंहिता कक्षाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाचा गुन्हासह सायबर अॅक्टनुसारही कारवाई करण्यात येणार आहे.
कमीत कमी वेळेत हवा तो संदेश सोशल मीडियाद्वारे देणे शक्य आहे. व्हॉट्स अॅप व इतर मोबाईल अॅप्लीकेशन्सचीदेखील यंदा चलती असणार आहे. ही बाब लक्षात घेता यंदा सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाईल. आचारसंहिता कक्षाच्या कार्यकक्षेत सोशल मीडियाला समाविष्ट केले गेले आहे. यातच फेसबूक किंवा इतर सोशल मीडियाद्वारे कुण्या उमेदवाराची, कार्यकत्र्याची किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराची बदनामी झाली तर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल. तसे आदेश निवडणूक शाखेतर्फे निर्गमीत झाले आहेत. यातच प्रचारसभा, प्रचार फे:या आदींच्या चित्रीकरणासाठी एकाच मतदारसंघात चार ते पाच पथके नियुक्त केले जाणार आहेत. पोलीस, सायबर सेल यांची मदत या पथकासाठी घेतली जाईल. आचारसंहितेच्या पालनासंबंधी जिल्हास्तरावर एक आणि मतदारसंघांमध्ये 11 एवढी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही मंडळी सोशल मीडियाकडे लक्ष ठेऊन असेल. तहसीलदार दर्जाचा एक अधिकारी प्रत्येक पथकात आहे.