वडाळी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:08 IST2019-09-19T12:08:15+5:302019-09-19T12:08:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला असून, दुपारी ...

वडाळी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला असून, दुपारी 12 वाजल्यापासून एकही जबाबदार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
याबाबत असे की, शहादा तालुक्यातील वडाळी येथील भिका माळी यांना अचानक झटका आल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्यांना तत्काळ दाखल केले असता. त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी आढळून आला नाही. त्यामुळे रुग्णाला एक तास ताटकळत बसावे लागले. हे प्राथमिक आरोग्य केंद्र मदर पी.एच.सी. म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. मात्र गेल्या आठ ते दहा महिन्यापासून या आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार वेळोवेळी चव्हाटय़ावर आला आहे. यास येथील वैद्यकीय अधिकारी जबादार आहे.
या केंद्रात औषधींचा नेहमीच तुटवडा असतो. तसेच कर्मचा:यांची कामाची पद्धत अतिशय उर्मट आहे. आलेल्या रुग्णांशी उर्मटपणे वागण्यात कर्मचा:यांची हातोटी आहे. या आरोग्य केंद्राशी 20 ते 22 खेडय़ांचा संपर्क असून, याठिकाणी कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना मात्र या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यामुळे संबंधित अधिका:यांची कर्मचा:यांवर कुठल्याही प्रकारे वचक राहिलेला नाही. दररोज दुपारी आरोग्य केंद्रात शुकशुकाट दिसून येतो. याबाबत अनेकदा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा कुठलाही उपयोग झाल्या नसल्याचे बोलले जात आहे.
वडाळी येथे दर बुधवारी आठवडे बाजार असल्याने या दिवशी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचा:यांची उपस्थिती आवश्यक असताना सुद्धा कोणीही दिसून आले नाही. या आरोग्य केंद्रात रुग्णांची नेहमीच हेळसांड होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा नेहमीच रोष असतो.