आंदोलनाचा इशारा देणा:या ग्राहकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:41 IST2019-11-04T13:41:22+5:302019-11-04T13:41:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील टॉवरच्या माध्यमातून नागरिकांना योग्य सेवेऐवजी खर्च करुनही समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. ...

Warning of agitation: Notice to these customers | आंदोलनाचा इशारा देणा:या ग्राहकांना नोटीसा

आंदोलनाचा इशारा देणा:या ग्राहकांना नोटीसा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील टॉवरच्या माध्यमातून नागरिकांना योग्य सेवेऐवजी खर्च करुनही समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. असे म्हणत तेथील ग्राहकांनी मोलगी भागातील चारही टॉवर जाळून होळी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे निवेदनकत्र्याना मोलगी पोलीस ठाण्यामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहे. परंतु तातडीने सेवा सुरळीत न झाल्यास होळी करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.
दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी दूरसंचार विभागामार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. त्यामुळे  मोबाईल धारकांना योग्य सेवा मिळत नाही. हा प्रकारमागील दोन वर्षापासून सुरू  असून परिसरातील लाखो ग्राहक  त्रस्त झाले आहे. त्यांना या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या सुविधा मिळत नाही. तर सद्यस्थितीत शासनामार्फत बहुतांश शासकीय व खाजगी कामे ऑनलाईन करण्यात आली  असल्याने दुर्गम भागातील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वमान्य नागरिकांसह अधिकारी व कर्मचा:यांची ऑनलाईन कामे    रखडत आहे. विविध बँका, मिनी बँका व शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबत मोबाईलधारकांमध्ये   नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसह  अन्य कामांसाठी नागरिकांना फे:या माराव्या लागत आहेत. बीएसएनएलच्या या सेवेला कंटाळलेल्या संतप्त पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिले. त्यातून सहन कराव्या लागणा:या समस्या निदर्शनास आणून देत सेवा सुरळीत न झाल्यास काही दिवासांनी टॉवरची होळी करण्यात येणार असल्याचा इशारा दोन दिवासांपूर्वी नागरिकांमार्फत देण्यात आला   होता.
निवेदन देणा:या नागरिकांना मोलगी पोलीस ठाण्यामार्फत सहा जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. त्यात जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सी.के.पाडवी, मोलगीचे माजी सरपंच शितल पाडवी, काठीचे सरपंच स्नेहा पाडवी, माजी सरपंच पृथ्वीसिंग तडवी, धिरसिंग वसावे रा.सरी व अॅड. सरदारसिंग वसावे यांचा समावेश आहे. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून तातडीने सेवा सुरळीत न झाल्यास चारही टॉवरची होळी करण्यासाठी चारा व लाकुडफाटा गोळा केल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.

अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथेही बीएसएनएलमार्फत टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे त्या भागातील अनेक गावांमधील नागरिकांची सोय होत होती. परंतु सहा महिन्यांपासून हा टॉवरच बंद झाला आहे, त्यामुळे शोकांतिका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या परिसराती नागरिकांना बीएसएनएलच्या सेवेऐवजी समस्यांनाच अधिक तोंड द्यावे लागत आहे. नेटवर्कच मिळत नसल्यामुळे 108 रुग्णवाहिका सेवा देखील रुग्णांसाठी उपल्बध होऊ शकत नाही.
धडगाव तालुक्यातील टॉवरची देखील अशीच परिस्थिती असल्याचे वारंवार ग्राहकांकडून तक्रारी करण्यात आल्या असून आजही खंडीत सेवा मिळत आहेत. त्यामुळे दुर्गम भागाकडे दुरसंचार विभाग दुजाभावानेच पाहत असल्याचे म्हटले जात आहे.  
 

Web Title: Warning of agitation: Notice to these customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.