मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:11+5:302021-02-11T04:33:11+5:30
नंदुरबार : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. त्यामुळे नंदुरबार आदिवासी प्रकल्प विभागाने या ...

मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशारा
नंदुरबार : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. त्यामुळे नंदुरबार आदिवासी प्रकल्प विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
अक्कलकुवा तहसीलदार यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार आदिवासी प्रकल्प कार्यालयातील एका आश्रमशाळा मुख्याध्यापकाच्या कारनाम्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित मुख्याध्यापक कोण? याची चौकशी करावी. मुख्याध्यापकासारख्या व्यक्तीने केलेल्या अशा कारनाम्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र कार्याला काळिमा फासला गेला आहे. त्यामुळे संबंधिताची चौकशी करून त्यास तातडीने बडतर्फ करावे, अन्यथा क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.