जिल्हा रुग्णालयात रेमिडिसीवरची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:07 IST2020-07-15T12:07:48+5:302020-07-15T12:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनावर सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या रेमिडिसीवर या इंजेक्शनचा जिल्ह्यात आजवर पुरवठाच झालेला नसल्याची माहिती ...

जिल्हा रुग्णालयात रेमिडिसीवरची प्रतिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनावर सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या रेमिडिसीवर या इंजेक्शनचा जिल्ह्यात आजवर पुरवठाच झालेला नसल्याची माहिती समोर आली असून जिल्हा रुग्णालयाने त्याची वारंवार मागणी करुनही ते मिळालेले नाही़ दरम्यान रुग्णालयाकडे फॅबिफ्ल्यूच्या गोळ्याही तोकड्याच असल्याची माहिती आहे़
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ यातून प्रतिबंधात्मक औषधींची मागणी वाढली आहे़ जिल्ह्यात औषधी विक्रीची ४५० दुकाने आहेत़ यात रेमिडिसीवर आणि फॅबीफ्लू या महागड्या औषधी विक्री होणे शक्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे़ दरम्यान या विक्रेत्यांनी तशी मागणीही नोंदवलेली नाही़ रेमिडिसीवर संपूर्णपणे शासकीय रुग्णालयांना देण्यात येणार असल्याने औषध विक्रेत्यांना मिळणारच नसल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान नंदुरबार शहरात एकाच दुकानात काही दिवसांपूर्वी ३० फॅबीफ्ल्यूच्या गोळ्या मागवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे़
दरम्यान जिल्हा रुग्णालय व एकलव्य स्कूल येथील कोविड कक्षात पुरवठा करण्यात येणाºया फॅबीफ्ल्यूच्या केवळ ८०० गोळ्या शिल्लक आहे़ या गोळ्यांसह रेमिडिसीवर हे इंजेक्शन मिळावे या करीता वारंवार जिल्हा रुग्णालय प्रशासन मुंबई येथे पत्रव्यवहार करत आहे़ मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही़ शासनाने परवानगी व पुरवठा केल्यास जिल्ह्यातील विक्रेते योग्य त्या दरात इंजेक्शन व गोळ्यांची विक्री करतील अशी माहिती केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी दिली़
अन्न व औषध प्रशासनाकडून रेमिडिसीवर आणि फॅबीफ्ल्यू या गोळ्या मुबलक प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहे़ पुणे येथे रेमिडिसीवरची निर्मिती होत आहे़ लवकरच ते जिल्हा रुग्णालयात पाठवले जाईल़
-एस़एऩसाळे, औषध निरीक्षक,
अन्न व औषध प्रशासन नंदुरबाऱ