आयटीआय शिक्षक वेतनाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:48 IST2019-06-20T12:48:30+5:302019-06-20T12:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अर्थाजनाचा मार्ग दाखवणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिक्षक फेब्रुवारी महिन्यापासून ...

आयटीआय शिक्षक वेतनाच्या प्रतिक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्याथ्र्याना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अर्थाजनाचा मार्ग दाखवणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिक्षक फेब्रुवारी महिन्यापासून मासिक वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत़ जिल्ह्यातील आठ आयटीआयमधील 35 च्या जवळपास शिक्षक आहेत़
नंदुरबार, नवापुर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, शिव्रे ता़ तळोदा, मांडवी ता़ धडगाव येथे शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आल्या आहेत़ यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली आह़े मूळात अस्थायी असलेल्या या शिक्षकांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देऊन दिली जात़े या मुदतवाढीनंतर त्यांच्या वेतनाचा न्यायनिवाडा शासन करत आह़े परंतू फेब्रुवारी महिन्यापासून या शिक्षकांचे वेतनच झालेले नसल्याचा प्रकार समोर आलेला आह़े मुदतवाढ मिळूनही वेतन मिळालेले नसल्याने शिक्षक सातत्याने तंत्रशिक्षण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करुनही समस्या दूर झालेली नाही़ शिक्षकांचे वेतनाअभावी प्रचंड हाल होत असून शाळा सुरु झाल्याने पाल्यांना विविध वस्तू आणि त्यांची शैक्षणिक फी भरण्याचीसह पैसे नसल्याने शिक्षक मेटाकुटीला आले आहेत़ जिल्हा प्रशासन, शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल घेत शिक्षकांच्या वेतनासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
दरम्यान राज्यातही आयटीआय शिक्षकांच्या वेतनाची स्थिती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आह़े शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेचे कामकाज सुरु असल्याने शिक्षकांना धावपळ करावी लागत आह़े यासाठी वेळावेळी खर्च लागत असल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत़