अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:02 IST2019-09-19T12:02:53+5:302019-09-19T12:02:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून ...

Waiting for help in the rainstorm | अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असून, त्यांनाही तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी या नुकसानग्रस्त कुटुंबांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पजर्न्यवृष्टी होवून खर्डी नदीला मोठा पूर आला होता. यामुळे पुराचे पाणी नदी काठालगत वसलेल्या कालिका माता परिसरातील अनेक घरांमध्ये शिरून घरांचे नुकसान झाले होते. याशिवाय संसारोपयोगी सामान व धान्यदेखील वाहून गेले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे केल असले तरी हे पंचनामे करतांना मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. कारण पथकातील कर्मचा:यांनी एकाच ठिकाणी बसून पंचनामे केले आहे. त्यामुळे या पथकाने ज्यांची नावे सांगितले त्यांचीच पंचनामे केले आहेत. परंतु जी नुकसानग्रस्तांची यादी आपणाकडे दिली होती. ती कुटुंबे खरोखर नदी किणारी राहत असून, त्यांनाच वगळण्यात आले आहे. साहजिकच बहुसंख्य कुटुंबे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. आपल्या स्तरावर तातडीने चौकशी करून राहिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी दुजाभावातून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यातआल्याचा आरोपही महिलांनी केला होता.
याप्रसंगी अंबालाल साठे, युवा शक्तीचे विनोद माळी व नुकसानग्रस्त उपस्थित होते.

4शहातील खर्डी नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आतापावेतो 550 कुटुंबांना साधाण 17 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. अजूनही मोठय़ा प्रमाणात क्षतीग्रस्त कुटुंबे राहिली आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. हा निधी आल्यावर लगेच वाटप करण्यात येणार असलल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान येथील प्रशासनाने पाठविलेल्या निधीच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून निधी उपलब्ध करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 

Web Title: Waiting for help in the rainstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.