आरटीपीसीआरसाठी पुन्हा काही दिवस वेटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:35 PM2020-08-09T12:35:55+5:302020-08-09T12:36:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीची प्रयोगशाळा सुरू होण्याची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे स्थानिक स्तरावर ...

Waiting a few days again for RTPCR | आरटीपीसीआरसाठी पुन्हा काही दिवस वेटींग

आरटीपीसीआरसाठी पुन्हा काही दिवस वेटींग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीची प्रयोगशाळा सुरू होण्याची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे स्थानिक स्तरावर होणाऱ्या रॅपीड अ‍ॅटींजन आणि ट्रूनेट या चाचण्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक रुग्णांचे या चाचण्यांनी समाधान होत नसल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी वाद देखील वाढले आहेत. ९ आॅगस्टचा मूहुर्त ठेवण्यात आला होता, परंतु हा मुहूर्तही टळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नंदुरबारात मे महिन्यातच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मंजुर झाली आहे. परंतु त्यासाठीचे उपकरण, जागा आणि प्रशिक्षीत कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी आॅगस्ट उजाडला. आता सर्व तयारी असतांनाही ही प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत हालचाली नसल्याची स्थिती आहे. सूत्रांनुसार आणखी पाच ते सहा दिवस त्यासाठी लागण्याची शक्यता आहे.
८९ लाखांचे उपकरण
आरटीपीसीआर प्रयोगशाळेसाठी ८९ लाखाचे उपकरण गेल्या आठवड्यातच येथे दाखल झाले आहे. यासाठी लागणाºया किट देखील उपलब्ध झाल्या आहेत. प्रयोगशाळेसाठी आवश्यक त्या इतर उपकरणांची जुळवाजुळव झालेली आहे. कर्मचाºयांनाही प्रशिक्षीत करण्यात आले आहे. परंतु किरकोळ बाबींअभावी ही प्रयोगशाळा सुरू होऊ शकत नसल्याची स्थिती आहे.
रॅपीड आणि ट्रूनेट
सध्या स्थानिक स्तरावर रॅपीड अ‍ॅण्टीजन आणि ट्रूनेट या दोन चाचण्या घेतल्या जात आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत व ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येत आहे त्यांचा स्वॅब आरटीपीसीआरच्या तपासणीसाठी पुढे पाठविले जात नाहीत. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर आरटीपीसीआरसाठी पाठविला जातो.
परंतु लक्षणे असूनही या दोन्ही चाचण्यांपैकी कुठलीही एक चाचणी निगेटिव्ह आली किंवा पॉझिटिव्ह आली तरीही तो स्वॅब आरटीपीसीआरसाठी पुढे पाठविला जातो. यामुळे मात्र धुळ्याच्या प्रयोगशाळेत किमान तीन ते चार दिवस वेटींग राहावे लागत आहे. त्यामुळे समस्या वाढत आहेत, आणि रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
किमान २०० वेटींग
अहवालांचे वेटींग किमान २०० पर्यंत राहत आहे. काही वेळा ते ४०० च्या घरात देखील असते. त्यामुळे मात्र अनेकांच्या मनात चलबिचलता असते. या काळात जे पॉझिटिव्ह असतात ते रुग्णालयात दाखल राहत नसल्याने ते इतरांमध्ये फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत जातात. त्यामुळे संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
याशिवाय अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांना जीव देखील गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.
येथील आरटीपीसीआर चाचणीसाठी धुळे प्रयोगशाळेत तपासले जाणारे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी अर्थात पडताळणीसाठी प्रायोगिक तत्वावर येथे पाठविले जात आहेत. तेथील अहवाल आणि येथील अहवाल मॅच होण्याचे प्रमाण जवळपास ९० टक्केपेक्षा अधीक आहे. आणखी काही स्वॅब पडताळणीसाठी येथे तपासले जाणार आहेत. त्यानंतर अधिकृतरित्या येथील प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी सांगितले.

Web Title: Waiting a few days again for RTPCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.