कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:58+5:302021-05-10T04:30:58+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीच्या डोसची प्रतीक्षा कायम आहे. दुसऱ्या डोससाठी ही लसच उपलब्ध नसल्याने अनेकांची फिरफिर होत ...

कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा कायम
नंदुरबार : जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीच्या डोसची प्रतीक्षा कायम आहे. दुसऱ्या डोससाठी ही लसच उपलब्ध नसल्याने अनेकांची फिरफिर होत आहे. सोमवारीदेखील ही लस उपलब्ध होणार नसल्याने दुसऱ्या डोससाठी कुणीही लसीकरण केंद्रावर येऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कोविशिल्ड लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, तिचे पहिले व दुसरे डोस देण्याचे काम नियमित सुरू आहे.
जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. ६० पेक्षा अधिक केंद्रांवर तसेच मोबाइल लसीकरण टीमद्वारे लसीकरण केले जात आहे. परंतु कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी मात्र लाभार्थींना फिरावे लागत आहे. आठ दिवसांपासून या लसीचा दुसरा डोस देणे बंद केले आहे. पुरेशा प्रमाणात साठा नसल्याने दुसरा डोस दिला जात नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून, लागलीच दुसरा डोस सुरू करण्यात येणार आहे. या लसीचा केवळ पहिला डोसच दिला जात आहे.
दरम्यान, कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्याचे नियमितपणे सुरू आहे. ही लस पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.