चांदसैली मार्गावर बसची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:22 IST2019-11-17T14:21:58+5:302019-11-17T14:22:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार महिन्यांपासून बससाठी बंद असलेला देवगोई ता.अक्कलकुवा घाटातील मार्ग बांधकाम विभागाच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात ...

चांदसैली मार्गावर बसची प्रतिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चार महिन्यांपासून बससाठी बंद असलेला देवगोई ता.अक्कलकुवा घाटातील मार्ग बांधकाम विभागाच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात आला आहे. अक्कलकुवा ते मोलगी बस सुरू होऊन चार दिवस झाल्यामुळे तळोदा ते धडगाव मार्गावरील बंद असलेली बससेवाही सुरू होईल, अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील प्रवाशांना सोयीचे ठरणारे अक्कलकुवा ते मोलगी, अक्कलकुवा ते जमानामार्गे धडगाव व तळोदा ते धडगाव या मार्गाची पूर्णपणे दुरवस्था झाली होती. त्यामुळे हे मार्ग बससेवेसाठी प्रतिकुल बनल्याने या मार्गावरुन धावणा:या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. पाऊस बंद झाला व काही प्रमाणात रस्ताही दुरुस्त झाल्यामुळे चार दिवसांपासून देवगोई घाटातील बंद बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चांदसैली मार्गाची देखील तातडीने दुरुस्ती करीत बंद असलेल्या नंदुरबार आगाराच्या बसेसही तातडीने सुरू करण्यात याव्या, अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तळोदा ते धडगाव या मार्गावर तुटलेल्या रस्त्यांपैकी केवळ पालखा येथील पुलाचीच दुरुस्ती करण्यात आली आहे. उर्वरित चांदसैली व उखळीआंबा येथील रस्ता दुरुस्त केला नसल्याने नाराजी व्यक्त केल जात आहे.
धडगावर्पयत नंदुरबार आजाराच्या एकुण सहा बसेस जातात. त्यापैकी शडादा मार्गे जाणारी एकच बस नियमित सुरु राहिली. देवगोई घाट सुरू झाल्याने अक्कलकुवामार्गे जाणारी बसही सुरू झाली. परंतु चांदसैली मार्गावरील चार मिनी बस अद्याप बंदच आहे. त्यामुळे नाराजी आहे.