वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:30 PM2019-11-16T12:30:04+5:302019-11-16T12:30:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. आधीच रहदारी असलेल्या या चौफुलीवर सध्या अवजड वाहनांची ...

Wagheshwari Chauffeur | वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा

वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाघेश्वरी चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. आधीच रहदारी असलेल्या या चौफुलीवर सध्या अवजड वाहनांची गर्दी देखील होऊ लागली आहे. त्यामुळे लहान मोठे अपघात देखील होत आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
धुळे, नवापूर, साक्री भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी वाघेश्वरी चौफुलीचा आधार घ्यावा लागतो. शिवाय शहादा, निझर भागाकडे जाण्यासाठी देखील वळण रस्ता म्हणून या चौफुलीचा आधार घेता येतो. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रहदारी वाढली आहे. नवापूरकडे आणि अक्कलकुवाकडे जाणा:या जड वाहनांची वाहतूक देखील याच भागातून होत आहे. त्यामुळे येथे वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यातच या भागात मोठय़ा प्रमाणावर कच्चे व पक्के अतिक्रमण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
रस्ता गॅरेजवाल्यांसाठी का?
धुळे रस्त्यावरील भोणे फाटा ते अव्वलगाझी दग्यार्पयत काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु हा रस्ता रहदारीसाठी कमी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलल्या गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी येणा:या चारचाकी व अवजड वाहनांना उभे राहण्यासाठीच अधीक वापरला जात आहे. परिणामी एकाच वेळी दोन मोठी वाहन निघणेही मोठे जिकरीचे ठरते. त्यामुळे हा रस्ता नेमका वाहतुकीसाठी आहे की गॅरेजवाल्यांसाठी आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्यामुळे देखील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. 
रस्ता खड्डयात
काँक्रीटीकरणाच्या या रस्त्याचे काम अध्र्यातूनच करण्यात आले  आहे. परिणामी दर्गाच्या गेटपासून ते पुढे चौफुलीपर्यत 100 ते 150  मिटरचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. या रस्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. खडी वर आलेली    आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होते. त्याचा परिणाम       लहान मोठे अपघात होण्यास होत आहे. 
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
या ठिकाणी नियमित दोन वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. कधी या ठिकाणी नेमणूक राहिली तर संबधीत कर्मचारी वाहनचालकांकडून केवळ दंडवसुलीचेच कामे करतात. गॅरेजवाल्यांना समज देणे किंवा वाहतूक सुरळीत करण्याचे काम कमीच होते. त्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. पोलीस दलातील एलसीबीच्या वाहनालाच चुकीच्या दिशेने येणा:या ट्रकने धडक दिल्याची घटना 14 रोजी वाघेश्वरी चौफुलीवर घडली. धडक देणा:या वाहनांने पोलिसांच्या वाहनासह आणखी एका ट्रकला देखील धडक दिली. त्यात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. थोडय़ावर निभावले अन्यथा या ठिकाणी मोठी घटना घडली असती. पोलिसांचेच वाहन या ठिकाणी सुरक्षीत राहू शकत नाही तर सामान्यांच्या वाहनांची काय हाल होत असेल, कशी कसरत होत असेल याचा अंदाज सहज येतो. या अपघातप्रकरणी हवालदार सतिष उगले यांनी फिर्याद दिल्याने पवनसिंग साहेबसिंग मेहर, रा.ताडपिंपळगाव, ता.कन्नड याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार ठाकरे करीत आहे.  

Web Title: Wagheshwari Chauffeur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.