जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:00 IST2019-10-22T11:59:38+5:302019-10-22T12:00:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने ...

जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैणात केला होता.
चारही मतदारसंघात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी, 855 होमगार्ड तैणात करण्यात आले होते. याशिवाय पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपअधीक्षक, 15 पोलीस निरिक्षक, 47 सहायक व उपनिरिक्षक हे अधिकारी बंदोबस्ताला होते. राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा मागविण्यात आल्या होत्या. त्या चारही मतदार संघात पाठवण्यात आल्या.
अक्कलकुवा मतदारसंघात एक डीवायएसपी, तीन निरिक्षक, 28 सहायक निरिक्षक, 339 पोलीस तर 251 होमगार्ड तैणात होते. शहादा -एक डीवायएसपी, 2 पोलीस निरिक्षक, 22 सहायक निरिक्षक, 270 पोलीस आणि 288 होमगार्ड, नंदुरबार- 1 डीवायएसपी, तीन निरिक्षक, 18 सहायक निरिक्षक, 289 पोलीस आणि 300 होमगार्ड, नवापूर मतदार संघात एक डीवायएसपी, दोन पोलीस निरिक्षक, 19 सहायक निरिक्षक, 321 पोलीस कर्मचारी आणि 217 होमगार्ड तैणात करण्यात आले होते.