मतदान अधिकारी,कर्मचा:यांचे दोन दिवस जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:28 IST2019-04-30T21:28:31+5:302019-04-30T21:28:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा ...

Voting Officer, Employee: Jagaran for two days | मतदान अधिकारी,कर्मचा:यांचे दोन दिवस जागरण

मतदान अधिकारी,कर्मचा:यांचे दोन दिवस जागरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन काही दिवसांपासून दिवसरात्र राबत आहेत. दोन दिवसांपासून तर जिल्हाधिका:यांपासून तर कर्मचा:यांर्पयत सर्वच 24 तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष. 
आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक विभागाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु शनिवारपासून धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे ईव्हीएमची मोजणी झाली. किती खराब झाले. ते परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. नंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत नंदुरबार येथील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. 
या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिका:यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचा:यांचे जागरण झाले होते. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागले. सोमवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर मंगळवारी दुपार्पयत कार्यालयातच होते, हे विशेष. 
या कर्मचा:यांसोबतच मतदान केंद्रांवर डय़ुटी असलेले कर्मचारी देखील दोन दिवस जागले. आदल्या दिवशी मतदान साहित्य घेवून आपापल्या गावाच्या केंद्रावर  पोहचले. काही केंद्रावर पंखे नाही, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव, मोकळ्या हवेची कमतरता यामुळे अशा केंद्रांवरील कर्मचा:यांचे जागरणच झालेच. शिवाय मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र संबधीत विधानसभा मतदार संघ मुख्यालयात पोहचविणे आणि तेथून मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी व घरी जाणे या  सर्व प्रवासाला रात्री 1 ते तीन वाजले होते. त्यामुळे या कर्मचा:यांचे देखील दोन दिवस जागरण झाले.  परंतु राष्ट्रीय कर्तव्याचा अभिमान बाळगत अशा कर्मचा:यांनी   कुठलीही तक्रार किंवा चिडचिडपणा  न करता आपले कर्तव्य  निभावले.
दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर काही कर्मचा:यांना सूट देण्यात आली तर बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्यामुळे कर्मचा:यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे.

Web Title: Voting Officer, Employee: Jagaran for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.