मतदान यंत्र तिरुपतीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:11 IST2020-09-14T12:11:17+5:302020-09-14T12:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात असलेले मतदान यंत्र एस.टी.मालवाहतूक वाहनाद्वारे तिरुपतीकडे रवाना करण्यात आले. जुने यंत्र अनेक दिवसांपासून ...

Voting machine sent to Tirupati | मतदान यंत्र तिरुपतीकडे रवाना

मतदान यंत्र तिरुपतीकडे रवाना


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात असलेले मतदान यंत्र एस.टी.मालवाहतूक वाहनाद्वारे तिरुपतीकडे रवाना करण्यात आले. जुने यंत्र अनेक दिवसांपासून येथे पडून होते. त्यामुळे ते संबधीत कंपनीकडे पाठविण्यात आले.
निवडणूक आयोगाने आता प्रत्येक निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन गरजेचे केले आहे. त्यामुळे नवीन मशीनचा वापर केला जातो. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पडून होते. एम वन म्हणून या मतदान यंत्रांची ओळख आहे. १५ वर्षांपूर्वीची ही यंत्रे होती. त्यामुळे ती संबधीत कंपनीकडे परत करणे आवश्यक होते. ही सर्व यंत्र वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जवळपास चार हजाराच्या आसपास यंत्रे रवाना करण्यात आली. त्यासाठी एस.टी.महामंडळाचे मालवाहू वाहनाचा वापर करण्यात आला आहे. ही वाहने तिरुपतीकडे रवाना झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
चार वाहनांमध्ये प्रत्येकी एक चालक व एक सहचालक तसेच यांत्रिकी कर्मचारी आहे.
 

Web Title: Voting machine sent to Tirupati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.