मतदार यादी पुर्नरिक्षणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:42 IST2020-03-14T12:42:28+5:302020-03-14T12:42:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी ...

मतदार यादी पुर्नरिक्षणास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व १ जानेवारी २०२० रोजी वयाचे १८ वर्ष पुर्ण करणाऱ्यांसाठी मतदान यादी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त नवीन तरुण मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १५ एप्रिल पर्यंत मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारण्यात येतील. मतदार नोंदणीसाठी २८ व २९ मार्च तसेच ११ व १२ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येईल. ३० एप्रिल पुर्वी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादी १५ मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त नव मतदारानी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.