तोरणमाळच्या भोंगऱ्यात सांस्कृतिक वारशाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:06 IST2020-03-08T22:06:36+5:302020-03-08T22:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ ता़ धडगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगºया बाजाराचे आयोजन करण्यात आले होते़ यानिमित्त येथे ...

Visualization of cultural heritage in the bustle of Toranmaal | तोरणमाळच्या भोंगऱ्यात सांस्कृतिक वारशाचे दर्शन

तोरणमाळच्या भोंगऱ्यात सांस्कृतिक वारशाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : तोरणमाळ ता़ धडगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगºया बाजाराचे आयोजन करण्यात आले होते़ यानिमित्त येथे पारंपरिक वेषभूषा व शस्त्रांसह हजारो आदिवासी बांधवांनी हजर झाले होते़ आदिवासी संस्कृतीचा वेगळा रंग असलेल्या या भोंगºया बाजारात होलीमातेची आराधना करणाºया गीतांसह निसर्ग गीते गाऊन महिला आणि पुरुषांनी ढोल, मांदल, बासुरी, डफ आदी वाद्यांवर नृत्याचे सादरीकरण करुन जल्लोष केला़
होळी हा सण आदिवासी समाजात अत्यंत महत्वाचा मानला जातो.. आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा पारंपरिक उत्सव असलेल्या होलिकोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भोंगºया बाजार भरवण्याची परंपरा आहे़ राज्यातील दुसºया क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ हे निसर्ग संपन्नेतेसोबत सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे़ याठिकाणी सोमवारी होणाºया होळीपूर्वी शनिवारी भोंगºया बाजारा भरवण्यात आला होता़ यात तोरणमाळसह परिसरातील ५६ पाडे आणि मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या सातपुड्यातील गावांमधील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दिली होती़ भोंगºयानिमित्त येणारे सर्व आदिवासी बांधव वाद्यांसह गोरक्षनाथ महाराज मंदिर परिसरात जमा झाले होते़ येथून दुपारी गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळीं उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ मिरवणूकीत सर्वांनीच ढोलच्या तालावर नृत्य करत होलिकोत्सवाच्या रंगांची उधळण केली़
भोंगºयानिमित्त काढलेल्या या शोभायात्रेत सरपंच मधुकर रानु चौधरी, उपसरपंच सीमा करणसिंग चौधरी, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल छोटू पावरा, विनायक सोनवणे, मोहन साळवे, अजित गावित, फुलसिंग पाडवी, भिमसिंग ठाकरे, गोमा वसावे, पोलीस पाटील ओलसिंग नाईक यांच्यासह सर्व ५६ पाडे व परिसरातील गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते़

धान्य पूजन करण्याची परंपरा
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, युवती तसेच पुरुष सहभागी झाले होते़ भोंगºया बाजारात संसारोपयोगी वस्तू, खेळणीसह विविध खाद्यपदार्थ कपडे विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले होते़ तोरणमाळ परिसरात १५ दिवस होळीचा उत्साह असतो़ या पार्श्वभूमीवर येथे धान्यपूजनाची परंपरा आहे़ सांस्कृतिक ठेवा जपणाºया तोरणमाळ येथे महाशिवरात्रीपासून होलिकोत्सवाची चाहूल लागते़ होळीनिमित्त बाजारपेठेतच चैतन्य असून सिंदी, झापी, फलाई या अतीदुर्गम भागातील आदिवासी बांधव येथे हजेरी लावून भोंगºयाची खरेदी करतात़

Web Title: Visualization of cultural heritage in the bustle of Toranmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.