राज्यस्तरीय आदर्श ग्राम समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:22 IST2019-09-07T12:21:43+5:302019-09-07T12:22:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेतर्गत मूल्यांकनाठी राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यात भेट दिली़ ...

राज्यस्तरीय आदर्श ग्राम समितीची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेतर्गत मूल्यांकनाठी राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यात भेट दिली़ शुक्रवारी भेट देणा:या समितीने नवापुर तालुक्यातील दोन गावांमधील कामांची पाहणी केली़
जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायती ग्राम सामाजिक परितर्वन अभियानात सहभागी आहेत़ यातील पहिल्या टप्प्यात 10 ग्रामपंचायतींनी विविध विकासकामे पूर्ण करुन दाखवली होती़ या 10 गावांनी परीवर्तन अभियानांतर्गत घोषित केलेल्या आदर्श ग्राम योजनेसाठी प्रस्ताव दिला होता़ यातील नवापुर तालुक्यातील वाटवी आणि चिखली या दोन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी देण्यात आले होत़े या दोन्ही गावांमधील सामाजिक, आर्थिक व विविध कामांची माहिती घेण्यासाठी आदर्शगाव संकल्प व प्रकल्पाचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातील राज्य समितीने शुक्रवारी जिल्ह्यात भेट दिली़ समितीत जलसंधारण व रोहयो विभागाचे उपसचिव प्रमोद शिंदे, कृषी सहसंचालक अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचा समावेश होता़ समितीने नवापुर तालुक्यातील चिखली आणि वाटवी येथे भेट देत माहिती घेतली़ समितीने चिखली येथील महिला आणि पुरुष ग्रामस्थांच्या भेटी घेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली़
प्रारंभी दोन्ही समिती सदस्यांचे चिखली येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करुन बैलगाडीवरुन त्यांची मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी ग्रामस्थांनी पांरपरिक ढोल व बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यू केल़े अभियानाच्या जिल्हा समन्वयक अॅड़ योगिनी खानोलकर यांनी पोपटराव पवार व ज्ञानेश्वर बोटे या दोघांना राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली़
जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी शेखर रौंदळ यांनी समितीचे नंदुरबार येथे स्वागत केले होत़े दोन्ही गावांच्या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मिशन मॅनेजर प्रफुल्ल रंगारी उपस्थित होत़े ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सिंदगव्हाण ता़ नंदुरबार, चिखली, भादवड, बिजगाव, बोरचक, निंबोणी, वाटवी ता़ नवापुर, खरवड, राडीकलम, खांडबारा, बोरवण, चोंदवाडे बुद्रुक, खडक्या, मनखेडी बुद्रुक, मनवाणी बुद्रुक, चुलवड, सोन बुद्रुक ता़ धडगाव तसेच डेब्रामाळ, होराफळी, डनेल आणि कुकडीपादर ता़ अक्कलकुवा या ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आह़े याठिकाणी विविध उपक्रम राबवून गावातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े यातील 10 ग्रामपंचायतींनी आदर्श गाव योजनेत सहभाग घेतला होता़ त्यातील वाटवी, चिखली या दोन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होत़े यांतर्गत समिती मूल्यांकनासाठी जिल्ह्यात दाखल झाली होती़ भेटीदरम्यान पोपटराव पवार यांच्याहस्ते भादवड येथील जलशुद्धीकरण व वितरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आल़े हे पाणी बचत गटांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येऊन रोजगार उपलब्ध होणार आह़े