जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लसीकरण शिबिरास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:12+5:302021-05-27T04:32:12+5:30
लसीकरणाबाबत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी लस सुरक्षित असून, कोरोना विरूद्ध लढाईसाठी सध्याचे ते एक महत्त्वाचे आयुध असल्याचे सांगितले. लसीकरणामुळेे ...

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लसीकरण शिबिरास भेट
लसीकरणाबाबत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी लस सुरक्षित असून, कोरोना विरूद्ध लढाईसाठी सध्याचे ते एक महत्त्वाचे आयुध असल्याचे सांगितले. लसीकरणामुळेे मृत्युचा धोका कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच भिलाडी व डामरखेडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील ४५ वयाच्या वरील सर्व नागरीकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबरीने कोविडच्या लढाईत सहभागी असलेल्या आरोग्य, ग्रामविकास, महसूल, नगरपरिषद, पत्रकार, स्वंयसेवी संस्था, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शहारांमध्ये लसीकरणासाठी पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे. मात्र आपल्याकडे पुरवठा पुरेसा आहे. परंतु मागणी कमी आहे. त्यामुळे आपल्याकडे लस सहज उपलब्ध असल्याने अधिकाधीक नागरिकांनी लस घ्यायला हवी, असे आवाहन केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभिजीत पाटील, हेमलता शितोळे, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक शिक्षण विभागाचे व आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.