विसरवाडी ग्रामपंचायत सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST2021-02-18T04:58:21+5:302021-02-18T04:58:21+5:30
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातून चांगले कामे ...

विसरवाडी ग्रामपंचायत सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातून चांगले कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, पारितोषिक विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे. उपमुख्य कार्यकरी अधिकारी शेखर रौदळ यांनी प्रास्ताविकात पुरस्कार योजनेविषयी माहिती दिली. स्व.आर.आर. पाटील यांनी ग्रामविकासासाठी बहुमूल्य योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. विसरवाडी येथील सरपंच बकाराम गावीत यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच बकाराम गावीत, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, गटविकास अधिकारी सी.के. माळी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर यांनी तालुकास्तरीयसहीत, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.
विसरवाडी ग्रामपंचायतचा तालुका व जिल्हा स्तरावर सन्मान झाल्यामुळे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विसरवाडी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. याप्रसंगी बबलू गावीत, विसरवाडी शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद वाघ, अबिद शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.